भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. या सामन्यासाठी भारतीय संघातून अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना बाहेर केले गेले. या तिघांनाही दुखापतीचे कारण सांगून संघातून बाहेर केले. मात्र, आता असा अंदाज बांधला जात आहे की, रहाणे आणि ईशांत सारख्या दिग्गजांना सन्मानजनक प्रकारे संघातून बाहेर करण्यासाठी दुखापतीचे फक्त कारण पुढे केलेले आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या सामन्याची सुरुवात गुरुवारी (३ डिसेंबर) झाली. हा सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने घोषित केले की रहाणे, ईशांत आणि रवींद्र जडेजाला वेगवेगळ्या प्रकारच्या दुखापती झाल्या आहेत आणि त्यामुळे ते संघातून बाहेर राहतील.
बीसीसीआयने सांगितल्याप्रमाणे रहाणेच्या हँमस्ट्रिंगमध्ये (स्नायुंमध्ये) ताण आला आहे. जो कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवसी क्षेत्ररक्षणावेळी आला होता. तो पूर्णपणे ठीक होऊ शकला नाही. तत्पूर्वी, कानपूरमधील कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे शेवटच्या दिवसापर्यंत तंदुरुस्त दिसत असल्यामुळे चाहते बीसीसीआयने सांगितलेल्या या कारणावर संशय उपस्थित करत आहेत
अजिंक्य रहाणेने भारताचे ८० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली अनुपस्थित असल्यामुळे त्याने संघाचे नेतृत्वही केलेले. याच कारणास्तव त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यातून थेट बाहेर करणे संघासाठी कठीण निर्णय होता. अशात चाहत्यांच्या मते बीसीसीआला त्याला संघातून सन्मानजनक प्रकारे बाहेर करण्यासाठी दुखापतीचा पर्याय वापरावा लागला.
https://twitter.com/_UnrealDaniel/status/1466636995346665480
*Rahane set to miss second test due to injury*
Dressing room scenes: pic.twitter.com/5ne0k1wHCh— Not.so.Cool🤡 (@b_kul25) December 3, 2021
By the way, I think Rahane's injury is a cover up. No way if he got injured on the final day and then there's no mention of it until yesterday. Next to impossible with 'sources' revealing & leaking all news these days.
— Gurkirat Singh Gill (@gurkiratsgill) December 3, 2021
भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज ईशांत शर्माबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे दिसते. ईशांतला पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी हाताच्या बोटाला दुखापत झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर त्याला संघातून बाहेर केल्याचे सांगितले जात आहे. ईशांतने जरी या दुखापतीवर मात करून संघात स्थान बनवले, तरी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान या युवा गोलंदाजांपुढे त्याचा निभाव लागणे कठीण आहे. अशात तो भविष्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान बनवू शकेल याबाबत देखील शंका आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन
मुंबईत शतक करणाऱ्या मयंकच्या कामी आला एका मुंबईकराचाच सल्ला, स्वत: सलामीवीराचा खुलासा
कोण असेल लखनऊचा मुख्य प्रशिक्षक? ‘या’ दोघांची नावे चर्चेत