वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना त्रिनिदाद येथे खेळला गेला. पाहुण्या भारतीय संघाने ३ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून देण्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने मोलाचा वाटा उचलला. त्याने शेवटच्या षटकात किफायतशीर गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला विजयापासून दूर ठेवले. यानंतर आता त्याने आपल्या शेवटच्या षटकातील रणनितीबद्दल माहिती दिली आहे.
पहिल्या वनडे सामन्यानंतर (First ODI) सिराज (Mohammad Siraj) आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी एकमेकांची मुलाखत घेतली. बीसीसीआयने या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सिराज श्रेयसला त्याच्या शेवटच्या षटकाबद्दल बोलत आहे. दुसरीकडे श्रेयसनेही शामराह ब्रूक्सच्या झेलनंतर आपण मैदानावर डान्स करण्यामागचे कारण सांगितले आहे.
मला माझ्या योजनेवर पूर्ण विश्वास होता
आपल्या शेवटच्या षटकाबद्दल बोलताना सिराज म्हणाला की, “मला अंतिम षटकात माझ्या यॉर्करवर पूर्ण विश्वास होता. चेंडूही खूप रिव्हर्स होत होता. त्यामुळे माझ्या योजनेवर पूर्णपणे अंमल करण्याच्या तयारीत होतो. शेवटच्या २ चेंडूंवेळी मात्र माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. कारण मी त्या क्षणी भारत देशाचे प्रतिनिधित्त्व करत होतो. माझी एवढीच योजना होती की, सुरुवातीच्या ४ चेंडूंप्रमाणेच शेवटचे २ चेंडूही फेकायचे.”
श्रेयस अय्यरच्या डान्स करण्यामागे होते मोठे कारण
मुलाखतीत पुढे श्रेयसने बाउंड्री लाईनवर डान्स करण्यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला की, “सीमारेषेजवळ बसलेले प्रेक्षक मला चिडवत होते. झेल सोड, झेल सोड, असे म्हणत ते मला डिवचत होते. याचवेळी चेंडू माझ्याकडे आला आणि तो अचूक पकडला. त्यानंतर मी डान्स करत त्या प्रेक्षकांना प्रत्युत्तर दिले.”
From last-over heroics in the 1st #WIvIND ODI courtesy @mdsirajofficial to rocking some dance moves ft @ShreyasIyer15, presenting a fun interview that oozes swag 😎😎 – by @28anand
Full interview 👇https://t.co/tau2J3GcBh #TeamIndia pic.twitter.com/4rou4918Zi
— BCCI (@BCCI) July 23, 2022
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजपुढे ३०९ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच शुमबन गिल (६४ धावा) आणि श्रेयस अय्यर (५४ धावा) यांनीही अर्धशतकी खेळी केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजकडून कायले मेयर्सने ७५ धावांची खेळी केली. ब्रेंडन किंग (५४ धावा) आणि शामराह ब्रूक्स (४६ धावा) यांनीही योगदान दिले. मात्र त्यांना फक्त ३ धावांच्या फरकाने सामना गमवावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अगंबाई..! रणवीर सिंगनंतर आता भारतीय क्रिकेटरही झाला नग्न, पत्नीकडून करून घेतले फोटोशूट
भारतीय संघाच्या विजयाचा आनंद द्विगुणित, लाराला अचानक ड्रेसिंग रूममध्ये पाहताच धवनचे आलिंगन
अबब! एकट्यानेच चोपल्या ४५० चेंडूत नाबाद ४१० धावा; १८ वर्षानंतर झाली लारासारखी कामगिरी