टोकियो पाॅरालिम्पिकमध्ये सोमवारी सकाळीच भारताच्या झोळीत ४ पदकांची भर पडली आहे, त्यातील २ पदकं भालाफेकीमध्ये मिळाली आहेत. टोकियो पाॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे तीन खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये रियो पाॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझरिया व्यतिरिक्त अजीत सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांचा सहभाग होता. या तीन खेळाडूंपैकी दोघांनी भालाफेकमध्ये पाॅरालिम्पिक पदक जिंकले आहे. देवेंद्र झाजडियाने ६४.३५ मीटरचे अंतर पार करत देशासाठी रौप्य पदक आणि सुंदर सिंग गुर्जरने ६४.१ मीटरपर्यंत भाला फेकत कांस्य पदक जिंकले आहे.
रियो पाॅरालिम्पिक स्पर्धेप्रमाणे भारताच्या झोळीत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक तर नाही आले पण, एकऐवजी दोन पदके आले आहेत. या स्पर्धेचे सुवर्णपदक श्रीलंकाच्या हेरथने त्याच्या नावावर केले. त्याने या स्पर्धेत ६७.७९ मीटर लांब भाला फेकत एक नवीन विश्वविक्रम केला आहे. हेरथने भालाफेक स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक हे श्रीलंकेसाठी टोकियो पाॅरालिम्पिक स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे.
2⃣ Indians sharing the podium – you love to see it 😍#IND continue their medal-winning run with #Silver for @DevJhajharia and #Bronze for @SundarSGurjar in the Men's Javelin Throw F46 final. 🙌#Tokyo2020 #Paralympics #ParaAthleticspic.twitter.com/P9DBROJ4Zj
— Olympic Khel (@OlympicKhel) August 30, 2021
धीम्या सुरुवातीमुळे रौप्य पदकावर मानावे लागले समाधान
टोकियो पाॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला देवेंद्र झाझरियाकडून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची आशा होती. मात्र, यावर्षीचे भालाफेक स्पर्धेतील सुवर्णपदक श्रीलंकेच्या हेरथच्या नावावर झाले आहे. अंतिम फेरीत देवेंद्रची सुरुवात धीमी होती. तरीदेखील त्याला स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्यात यश मिळाले आहे. तसेच देशासाठी कांस्य पदक जिंकणारा सुंदर सिंग गुर्जर सुरवातीपासूनच पहिल्या चारमध्ये राहिला होता. एक वेळ तर अशी आली होती की, तो रौप्यपदक जिंकेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, नंतर देवेंद्रने त्याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले.
महत्त्वाच्या बातम्या –
खूशखबर! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये योगेश कथूनियाचे रुपेरी यश; भारताला मिळवून दिले पाचवे पदक
मोठी बातमी! भारताकडून ४ धावांत ६ विकेट्स घेणारा स्टुअर्ट बिन्नी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात फेरबदल; बटलरची उर्वरित मालिकेतून माघार, तर ‘या’ गोलंदाजांचे पुनरागमन