ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची दिग्गज कर्णधार मेग लॅनिंग हिने गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. जबरदस्त कारकीर्द राहिलेल्या मेगच्या निवृत्तीमुळे सर्व क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. मेगची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. तिच्या निवृत्तीनंतर जगभरातून प्रतिक्रिया आल्या. अशात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेदेखील मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हरमननुसार, मेग अजून काही वर्षे खेळू शकली असती आणि ऑस्ट्रेलियासाठी चांगले प्रदर्शन करू शकली असती.
मेग लॅनिंग (Meg Lanning) ही जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तिने तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचे 2 किताब जिंकून दिले आहेत. याव्यतिरिक्त तिने 5 वेळा महिला टी20 विश्वचषकाचा किताबही ऑस्ट्रेलियाला जिंकला होता. सर्व क्रिकेट प्रकारात मिळून तिच्या नावावर 8 हजारांपेक्षा जास्त धावांची नोंद आहे. अशात या दिग्गज खेळाडूने 31 वर्षांच्या वयात क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
काय म्हणाली हरमनप्रीत?
हरमनप्रीत कौर हिने जरा वेगळे मत मांडले आहे. तिला वाटते की, मेग लॅनिंग ही अजून बरेच क्रिकेट खेळू शकली असती. तिने ऑस्ट्रेलियन माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मेग लॅनिंग ज्याप्रकारची खेळाडू आहे, त्यावरून हा खूपच हैराण करणारा निर्णय आहे. मला अजूनही वाटते की, ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी ती अनेक वर्षे खेळू शकत होती. तसेच, चांगले प्रदर्शन करू शकत होती. मात्र, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. एक महिला क्रिकेटपटू म्हणून तिने तिच्या कारकीर्दीत खूप काही मिळवले आहे. ती पुढे येऊन संघाचे नेतृत्व कत होती. तसेच, तिने अनेक आयसीसी पुरस्कारही जिंकले होते.”
पुढे बोलताना हरमन असेही म्हणाली की, “मला वाटते की, तिने आपल्या कारकीर्दीत बरंच काही साध्य केले आहे, जे एक खेळाडू म्हणून आमचे स्वप्न असते. मी तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते.”
मेगची कामगिरी
मेगने 13 वर्षांच्या कारकीर्दीत एकूण 241 सामने खेळले. त्यातील 182 सामन्यात ती कर्णधार म्हणून खेळली. यादरम्यान तिच्या बॅटमधून एकूण 8352 धावाही निघाल्या. मेगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 17 शतकांचाही पाऊस पाडला आहे. (indian captain harmanpreet kaur reacts on meg lanning s shocking retirement decision)
हेही वाचा-
World Cup Semifinal: वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला; म्हणाला, ’11 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी…’
World Cup Semifinal: ‘रोहित न्यूझीलंडविरुद्ध ठरणार…’, माजी खेळाडूची भारतीय कर्णधाराबद्दल मोठी प्रतिक्रिया