भारतीय क्रिकेट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. एकिकडे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका विजयाचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सध्या बरमिंघम येथे राष्ट्रकूल स्पर्धेत सहभीगी झालेल्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. हा अंतिम सामना रविवारी (७ ऑगस्ट) एजबैस्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय पुरुष संघाने महिला संघाला या सामन्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय पुरुष संघ सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अमेरिकेत आह. या मालिकेतील ५वा आणि शेवटचा सामनासुद्धा रविवारी (७ ऑगस्ट) रोजी खेळवला जाणार आहे. त्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी एक छान व्हिडिओ शेअर करत महिला संघाला गोल्ड मेडल विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह अन्य खेळाडूंनीही शुभेच्छा देत ‘गो फॉर गोल्ड’ म्हणत महिला संघाला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
Wishes and good luck galore for our Women's Team from our Senior Men's Team as they take on Australia in the Finals of the #CWG2022 today.#GoForGold #GoForGlory pic.twitter.com/FvMCJ7zWpg
— BCCI Women (@BCCIWomen) August 7, 2022
विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय महिला संघासाठी एक विशेष संदेश दिला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, भारतातील एकुण १५० कोटी लोकांच्या नजरा तुमच्यावर टिकून आहेत. शिवाय इतक्या लोकांच्या प्रार्थनाही तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे देव तुम्हाला साथ देऊल आणि तुम्ही सुवर्णपदक जिंकाल याची आम्हला खात्री आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये रविवार (७ ऑगस्ट) रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या पहिल्या महिला क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना सुरू होील. या सामन्यात विजयी संघासुवर्ण पदकाचा मानकरी होईल तर पराभूत झालेल्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvWI: विडींजला पराभवासह करावा लागणार शेवट! घातक भारतीय गोलंदाज म्हणतोय, ‘मी पुढील मॅच…’
सूर्यकुमारच्या फटक्याने चाहत्यांना झाली थेट धोनीची आठवण! पाहा धमाकेदार हॅलिकॉप्टर शॉट
भारतीय कर्णधाराने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना दिलं विशेष गिफ्ट, पाहा व्हिडिओ