दुसऱ्या टी२० सामन्यात शानदार विजय मिळवत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली व इशान किशनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ७ विकेट्सने पराभूत केले. असे असले तरीही भारतीय संघ विजेत्या संघातील अकरा खेळाडूंना कायम ठेवेल की नाही याबद्दल आता मोठी चर्चा रंगली आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ तिसऱ्या टी२० सामन्यात संघात काही बदल करु शकते. त्यातील सर्वात मोठा बदल हा सलामीचा आहे. या सामन्यात मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा कमबॅक करण्याची शक्यता असून केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
केएल राहुलला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या टी२० सामन्यात राहुलने एक तर दुसऱ्या सामन्यात शुन्य धावा केल्या होत्या. रोहितला पहिल्या दोन टी२० सामन्यात आराम देण्यात आला होता. याबद्दल खुद्द विराट कोहलीने खुलासा केला होता. यामुळे पहिल्या सामन्यात रोहितच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आली होती तर दुसऱ्या सामन्यात इशान किशनला संधी देण्यात आली. परंतू या दोनही सामन्यात केएल राहुल मात्र सपशेल अपयशी ठरला. आता रोहितला जर कमबॅक करायचे असेल तर केएल राहुलला जागा खाली करावी लागेल, असे बोलले जात आहे.
केएल राहुलने गेल्या काही मालिकांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. दोन सामन्यांच्या कामगिरीवर त्याला बाहेरचा रस्ता दाखवले अन्याय केल्यासारखे होऊ शकते. राहुलने आयपीएल २०२०, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका व टी२० मालिका, न्यूझीलंडविरुद्धची वनडे आणि टी२० मालिकेत शानदार प्रदर्शन केले आहे. असे असूनही त्याला ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत संधी मिळाली नव्हती. याचमुळे त्याची लय बिघडल्याचे बोलले जात आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यासाठी संभावीत प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल
महत्वाची बातमी:
शानदार विजयानंतर विराटसेनेच्या आनंदावर विरजण, या कारणामुळे आयसीसीने ठोठावला दंड
आज हिरो ठरलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार
आयपीएल २०२२ मध्ये ईशान आणि सूर्यकुमार नसणार मुंबईचा भाग? हे आहे कारण