आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांचा आमना सामना झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्स राखून राजस्थान रॉयल्सवर मात केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हा सामना अवघ्या १७.१ षटकांतच जिंकला. सामन्यात राजस्थानच्या फलंदाजीवेळी संघाने १०० धावा करेपर्यंत केवळ १ विकेट गमावला होता, पण त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. २० षटकात आरसीबीने राजस्थानचे १४९ धावांवर ९ विकेट्स घेतले.
आरसीबीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने सामन्यात २ विकेट्स घेतल्या आणि तो आपल्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला. यावेळी त्याची पत्नी धनश्री वर्मा मैदानात त्याला प्रोत्साहन देताना दिसली आहे.
युजवेंद्र चहलने सामन्यात २ विकेट्स घेतल्यामुळे त्याची पत्नी धनश्री खूपच आनंदात दिसली आहे. तिचे या सामन्यातील मैदानावरील फोटो व्हायरल होत आहेत. सामन्यात ज्या दोन गोलंदाजांनी त्यांचा चार षटकांचा स्पेल पूर्ण केला, त्यापैकी चहल एक गोलंदाज होता. चहलने त्याच्या ४ षटकांमध्ये केवळ १८ धावा देत संघासाठी फायदेशीर गोलंदाजी केली. तसेच २ महत्वाचा फलंदाजांना बादही केले.
Dhanashree 🥵😍❤️#RRvRCB #rcb pic.twitter.com/dSpSOlRPXo
— 🅾️റ്റയാൻ (@Ottayann) September 29, 2021
https://www.instagram.com/p/CUagI2QNUOj/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CUbN18oIycJ/?utm_source=ig_web_button_share_sheet
त्याने केलेल्या जबरदस्त प्रदर्शनानंतर त्याला टी२० विश्वचषकासाठी संधी का दिली गेली नाही? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या संघात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी दिली गेली नाही. त्यानंतर निवडकर्त्यांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता चहल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असल्यामुळे याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. असे असले तरीही, १० ऑक्टोंबरपर्यंत विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात बदल केला जाऊ शकतो.
दरम्यान, सामन्यात आरसीबीने राजस्थानला ७ विकेट्सने चितपट केले आहे. आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या विकेट्ससाठी ४८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या षटकात दोन्ही सलामीवीर बाद झाले. यानंतर श्रीकर भरत (४४ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेलने संघाचा मोर्चा सांभाळला. मॅक्सवेलने या सामन्यात ३० चेंडूत नाबाद ५० धावांची महत्वाची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
त्यावेळी मॉर्गनने विश्वचषक उचलण्यास नकार द्यायला हवा होता, सेहवागचा इंग्लिश कर्णधाराला टोला
“सौरभ तिवारीकडे बघितले तर तो सूर्यकुमार आणि इशानपेक्षा धावा काढण्याची जास्त भूक दाखवत आहे”
अखेर ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, कसोटी अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे