आयपीएल २०२२ च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) आयोजित केला होता. बेंगलोरमध्ये आयोजित या मेगा लिलावात फ्रेंचायझींकडून खेळाडूंवर मोठ्या बोल्या लावल्या गेल्या. अनेक खेळाडूंना आता नवीन फ्रेंचायझींनी विकत घेतले आहेत, यामध्ये काही दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. मागच्या हंगामापर्यंत कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) खेळणारा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (dinesh karthik) आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये (RCB) सहभागी झाला आहे. अशात दिनेशने एक खास पोस्ट करून त्याच्या जुन्या संघाचे आभार मानले आहे.
आरसीबीने मेगा लिलावात दिनेश कार्तिकवर सर्वात मोठी बोली लावली आणि त्याला संघासोबत जोडले. कार्तिकला संघात घेण्यासाठी आरसीबीला तब्बल ५ कोटी ५० लाख रुपये खर्च करावे लागले. कार्तिक यापूर्वीही आरसीबीसाठी खेळला आहेत. दरम्यान, कार्तिक आणि केकेआरचा आता कसलाही संबंध राहिलेला नाहीय. केकेआरसाठी कार्तिकने दोन पूर्ण हंगाम आणि २०२० मध्ये अर्ध्या हंगामात कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे.
केकेआरसोबतचे नाते तुटल्यानंतर अनुभवी कार्तिकने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट करून संघातील सर्व सदस्य, व्यवस्थापन आणि मालकांचे आभार मानले आहे. त्याने लिहिले की, “कुटुंबासारखा संघ. खेळाडूंपासून ते सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांपर्यंत केकेआरच्या प्रत्येक सदस्याचे घरच्यासारखी वागणूक देण्यासाठी आभार.”
https://www.instagram.com/p/CaCc6-5I8KZ/
दरम्यान, दिनेश कार्तिकच्या केकेआरसोबत केकेल्या कामगिरीचा विचार केला, तर त्याने संघासोबत ६१ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ११४३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ अर्धशतकेही ठोकली. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याने ३५ खेळाडूंना झेलबाद केले, तर ६ खेळाडूंना स्टंपिंग करून बाद केले.
कार्तिकसारखा दिग्गज खेळाडू जरी केकेआरमधून बाहेर पडला असला, तरी युवा फलंदाज श्रेयस अय्यरला मात्र संघाने विकत घेतले. श्रेयससाठी केकेआरने तब्बल १२ कोटी रुपये खर्चे केले आणि त्याला संघाचा कर्णधार देखील बनवले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल स्पर्धेच्या लिलावात धोनीच्या राज्यातील खेळाडू सर्वात पुढे, केली इतक्या कोटींची कमाई