आयपीएल 2024 चा सलामीचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कोणत्या नव्या भूमिकेत दिसतो, याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत.
धोनीनं काही दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुकवर पोस्ट केली होती की, “नवा हंगाम आणि नव्या भूमिकेची वाट पाहू शकत नाही”. अशा परिस्थितीत आता धोनी कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. धोनीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होणार की चेन्नईचा कर्णधार बदलणार? अशा चर्चांना सध्या वेग आलाय.
धोनी वर्षभरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. गेल्या वर्षी आयपीएलनंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनीनं गेल्या हंगामात फार कमी फलंदाजी केली होती. मात्र, या हंगामात सीएसकेच्या अडचणी वाढल्या आहेत. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर पडला आहे. तर शिवम दुबे देखील दुखापतग्रस्त आहे. याशिवाय मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं निवृत्ती घेतली आहे. अशा स्थितीत धोनी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणच्या मते, धोनी त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची शक्यता फार कमी आहे. इरफाननं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, “मी काही दिवसांपूर्वी धोनीला भेटलो होतो. तो सलग दोन तास पिकलबॉल खेळत होता. त्याचा गुडघा पूर्वीसारखाच तंदुरुस्त होता. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तो त्याच्या जुन्या लूकमध्येही परततोय. त्यामुळे आता आम्हाला जुना धोनी पुन्हा पाहायला मिळेल का?”
इरफान पुढे म्हणाला, “गेल्या दोन हंगामांपासून धोनीची भूमिका बदलली आहे. तो फलंदाजीला खाली येतो, कमी चेंडू खेळतो पण मोठे फटके मारतो. त्याचा स्ट्राइक रेट जास्त असतो. तो छोटी पण उपयोगी खेळी खेळतो. मला वाटतं यंदाही त्यात फारसा बदल होणार नाही. तो हीच भूमिका बजावत राहील. ”
महत्त्वाच्या बातम्या-
Video : रोहित-हार्दिकमध्ये सर्वकाही ऑल इज वेल! एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ गोलंदाज आयपीएलमध्ये खेळणार, मुंबई इंडियन्समध्ये 17 वर्षीय खेळाडूची एंट्री
IPL 2024 च्या उद्घाटन समारंभात कोणते स्टार्स परफॉर्म करणार? कसा असेल कार्यक्रम? जाणून घ्या सर्वकाही