इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स खेळला गेला. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सनं 3 गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा संघ 20 षटकांत 142 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सनं हे लक्ष्य 19.1 षटकांत 7 गडी गमावून गाठलं.
धावांचा पाठलाग करताना वृद्धिमान साहा 11 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. अर्शदीप सिंगनं त्याला आशुतोष शर्माच्या हाती झेलबाद केलं. कर्णधार शुबमन गिलनं 29 चेंडूत 35 धावांचं योगदान दिलं. त्यानं 5 चौकार लगावले. लिव्हिंगस्टोननं त्याला रबाडाच्या हाती झेलबाद केलं. राहुल तेवतियानं 18 चेंडूत मोल्याच्या नाबाद 36 धावा केल्या आणि गुजरातला विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरात गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहचला आहे. त्यांचे 8 सामन्यात 4 विजय आणि 4 पराभव आहेत. पंजाब किंग्ज 8 सामन्यात 6 पराभवानंतर नवव्या स्थानी आहे.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली होती. प्रभसिमरन सिंगनं 21 चेंडूत 35 आणि कर्णधार सॅम करननं 20 धावा केल्या. संघानं पहिली विकेट 52 धावांवर गमावली. यानंतर जी पडझड सुरू झाली, ती शेवटपर्यंत थांबली नाही. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे पंजाबचा संघ दडपणाखाली आला होता.
शेवटी 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरप्रीत ब्रारनं 12 चेंडूत 29 धावा करत संघाची लाज राखली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जनं 20 षटकांत 142 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. गुजरात टायटन्सकडून फिरकीपटू साई किशोरनं 4 षटकांत 33 धावा देत 4 बळी घेतले. तर नूर अहमद आणि मोहित शर्मानं प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – राहुल चहर, विद्वत कवेरप्पा, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, शिवम सिंग
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – साई सुदर्शन, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर
महत्त्वाच्या बातम्या –
“कृपया हा नियम काढून टाका”, आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’बाबत मोहम्मद सिराजचं मोठं विधान
साल बदललं, खेळाडू बदलले, मात्र आरसीबीचं नशीब बदलेना! यावर्षी प्लेऑफसाठी पुन्हा जर-तरची परिस्थिती
रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका रननं पराभव, केकेआरनं शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय