२९ मार्चपासून आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होत आहे. मात्र हा हंगाम सुरु होण्याआधी बीसीसीआयने बक्षीसाच्या रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२० साठीची बक्षिसांची रक्कम बीसीसीआयने २०१९पेक्षा कमी केलेली आहे.
मागील वर्षी आयपीएलच्या विजेत्याला मिळणारी २० कोटींची रक्कम आता १० कोटींवर आणली असून उपविजेत्या संघाला आता १२.५ कोटींच्या ऐवजी ६.२५ कोटी रुपये मिळतील. याशिवाय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना यावर्षी ४.३ कोटी रूपये मिळतील. बीसीसीआयने काढलेल्या परिपत्रकामध्ये याची माहिती दिली.
हा निर्णय पैशांची बचत करण्यासाठी घेतला गेल्याचे बीसीसीआयने परिपत्रकामध्ये म्हटले आहे. तसेच सर्वच संघ आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याने आणि त्यांना प्रायोजक मिळवून आपले उत्पन्न वाढवता येणे शक्य असल्याने हा निर्णय बीसीसीआयकडून घेतला गेला, असे एका सुत्राने पीटीआयला सांगितले आहे.
याशिवाय राज्य क्रिकेट संघटनांना आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी १ कोटी रुपये मिळतील. हे १ कोटी रुपये नवीन करारानुसार संघमालक आणि बीसीसीआय मिळून प्रत्येकी ५० लाख रुपये राज्य क्रिकेट संघटनांना देतील.
महत्त्वाच्या बातम्या-
–टी२० सामन्यात हार्दिक पंड्याचे तुफानी शतक; अर्ध्या संघालाही पाठवले तंबूत
–असा कारनामा करणे नक्कीच सोपं नव्हतं, पण १६ वर्षीय शेफाली करुन दाखवलंच!
–तब्बल १३ वर्षांनंतर बंगाल रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात