भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील काही दिवसांपासून लग्नाच्या कारणामुळे चर्चेत होता. अखेर या क्रिकेटपटूने आज (१५ मार्च) स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. बुमराहने सोशल मीडियाद्वारे त्याच्या लग्नाची माहिती सर्वांना दिली आहे. त्याच्या लग्नातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
बुमराहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘प्रेम जर योग्य असेल, तर आपल्याला ते योग्य मार्ग दाखवते. आजपासून मी आणि संजनाने एकमेकांसोबत नवा प्रवास सुरू केला आहे. हा आमच्या जिवनातील सर्वात आनंदी दिवस आहे. आमच्या लग्नाची बातमी तुम्हा सर्वांना कळवण्यात मला आम्हाला खूप आनंद होत आहे.’
https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/?utm_source=ig_web_button_share_sheet
लग्नाच्या कारणास्तव घेतली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार
जसप्रीत बुमराहने भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. त्यानंतर खरे कारण समोर आले होते की, त्याने विवाहपूर्व तयारीसाठी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. बुमराहच्या अनुपस्थित संघात दुसऱ्या गोलंदाजाला संधी देण्यात आली नव्हती.
कोण आहे संजना गणेशन?
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणुन कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेटव्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धेत अँकर म्हणून दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा दुसऱ्या टी२०त ‘विराट’ विजय; ‘हे’ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार
अफगानी स्पिनर राशिद खानने रचला इतिहास, ठरला २१ व्या शतकातील विश्वविक्रमी गोलंदाज
‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला