भारतामध्ये क्रिकेट खेळाडूंची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर व विराट कोहली सारख्या खेळाडूंसाठी अनेक क्रिकेट चाहत्यांनी वेगवेगळी कृत्ये केल्याचे नेहमीच समोर आले आहे. सध्या असाच एक प्रसंग घडला तो भारताचा माजी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण याच्यासोबत. युसुफचा एक चाहता तब्बल 200 किलोमीटर रिक्षाने प्रवास करत त्याला भेटण्यासाठी पोहोचला आहे.
जावेद नामक एक रिक्षाचालक युसुफचा फार मोठा चाहता आहे. त्याने आपल्या रिक्षाच्या मागील बाजूवर युसुफचा मोठा फोटो लावलेला आहे. स्वतः युसुफने जावेद सोबत झालेल्या भेटीची माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे. युसुफने लिहिले, “जावेद याने या भेटीसाठी 200 किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याला भेटून फार आनंद झाला. माझ्यावर बिनशर्त केलेल्या प्रेमासाठी मी त्याचा आभारी आहे.”
युसुफला भेटल्याचा आनंद जावेदच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. तसेच युसुफला देखील आपल्या इतक्या मोठ्या चाहत्याला भेटून निश्चितच समाधान वाटले असेल.
https://www.facebook.com/307083702751174/posts/3483664691759710/?d=n
युसुफ पठाणची क्रिकेट कारकिर्द
युसुफ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. त्याने भारतासाठी 57 वनडे व 22 टी20 सामने खेळले आहेत. युसुफने 57 वनडे सामन्यात 2 शतक व 3 अर्धशतकांसह 810 धावा केल्या आहेत. याच सोबत त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवत 33 बळीदेखील मिळवले आहेत. तसेच युसुफने 22 टी20 सामन्यात 236 धावा व 13 बळी मिळवले आहेत.
युसुफने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामन्यात 2012 साली खेळला असून त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन जवळजवळ अशक्य मानले जात आहे. आयपीएल 2020च्या लिलावासाठी युसुफवर कोणीही बोली लावली नव्हती. त्यामुळे त्याच्या समर्थकांना आशा असेल की, आयपीएल 2021 साठी होणाऱ्या लिलावात त्याला कोणता-ना-कोणता संघ खरेदी करेल व पुन्हा एकदा मैदानावर युसुफचे षटकार बघायला मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
कहर! धोनीने बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजाने दाखवला दम, अवघ्या ७ सामन्यात चोपल्या ३५० धावा
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणार्या प्रियांकला आता तरी संधी मिळणार का?
भारताविरुद्ध गोलंदाजांची भूमिका निर्णायक! इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांचे मत