ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) यांच्यातील सिडनीमध्ये खेळला गेलेला चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. इंग्लंडने सामना अनिर्णीत केल्यानंतर काही वेळातच त्याचा कर्णधार जो रूट (joe root) याने चाहत्यांना एक मोठा झटका दिला. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला (jos buttler) सिडनी कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. आता याच पार्श्वभूमीवर तो ऍशेस मालिकेतील (ashes series) पुढच्या सामन्यात उपस्थित राहू शकणार नाही. कर्णधार जो रूटने याविषयी सामना संपल्यानंतर माहिती दिली.
दरम्यान, उभय संघात खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील चौथा सामना सिडनीमध्ये खेळला गेला. हा सामना इंग्लंडने शेवटच्या दिवशी अनिर्णीत केला आणि मालिकेत क्लीन स्वीप होण्यापासून स्वतःला वाचवले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल २४ वर्षांनंतर कसोटी सामना अनिर्णीत केला आहे. यापूर्वी इंग्लंडने १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी सामना अनिर्णीत केला होता. इंग्लंडने सिडनीमधीक कसोटी सामन्यात विजय मिळवला नसला तरी, या अनिर्णीत केलल्या सामन्याने संघाची काही प्रमाणात लाज राखली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून आणि ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पाचव्या कसोटीत जोस बटलर उपस्थित नसेल
उभय संघातील पाचवा कसोटी सामना होबार्टमध्ये खेळला जाणार आहे, जो १४ जानेवारीपासून सुरू होईल. परंतु, या आगामी सामन्यासाठी यष्टीरक्षक जोस बटलर उपस्थित नसेल. कर्णधार जो रूटने चौथा सामना संपल्यानंतर याविषयी माहिती दिली. रुट म्हणाला की, “बटलरच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला घरी परतावे लागणार आहे.” बटलरला सिडनी कसोटीदरम्यान पहिल्या डावात यष्टीरक्षक करताना हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. पंरंतु तरीही त्याने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये फलंदाजी केली. सिडनीतील दोन्ही डावांमध्ये मिळून त्याने एकूण ११ धावा केल्या.
Joe Root has confirmed that Jos Buttler will be flying home before the fifth Test with a broken finger.
Buttler sustained the injury while keeping in the first innings, but still batted twice in the game.#Ashes pic.twitter.com/aNzGuuSIbU
— Wisden (@WisdenCricket) January 9, 2022
पाचव्या कसोटीत जोस बटलरच्या अनुपस्थितीत केंट संघासाठी खेळणार्या सॅम बिलिंग्सला संघात सामील केले जाण्याची शक्यता आहे. होबार्टमध्ये खेळला जाणारा पाचवा सामना डे-नाइट कसोटी असणार आहे, सॅम बिलिंग्सला या सामन्यातून स्वतःचे कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या –
…आणि पर्यावरण मंत्र्यातील खेळाडू खूश झाला; थरारक सिडनी कसोटीनंतर आदित्य ठाकरेंचे खास ट्विट
सुदैव म्हणतात ते हेच! कॅच सुटला, षटकारही नाही मारला अन् नो बॉलही नाही, तरी फलंदाजाला मिळाल्या ७ धावा
निवृत्ती घेण्यापूर्वी खेळाडूंना बोर्डाला द्यावी लागणार नोटीस, वैतागलेल्या श्रीलंका क्रिकटचे कडक नियम
व्हिडिओ पाहा –