भारतीय संघाने मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. चालू वर्षाच्या शेवटी देखील टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देवने संघातील वरिष्ठ खेळाडूंना सुनावले आहे. यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांचा समावेश आहे.
कपिल देप (Kapil Dev) यांच्या मते भारतीय खेळाडूंनी निर्भिड होऊन खेळले पाहिजे. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) या तिघांना कपिल देवकडून चांगलेच सुनावले गेले.
एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना कपिल देव म्हणाले की, “त्यांच्यात खूप गुणवत्ता आहे आणि ती साध्य करण्याचा दबाव देखील आहे, जो नसला पाहिजे. आपल्याला निर्भिड क्रिकेट खेळावे लागणार आहे. हे सर्व असे खेळाडू आहेत, जे १५०-१६० च्या स्ट्राईक रेटने सतत धावा करू शकतात. जेव्हा धावा करण्यासाठी तुम्हाला त्यांची गरज असते, तेव्हा ते सर्वजण बाद होतात. जेव्हा रन-रेट वाढवण्याची वेळ येते, तेव्हा हे बाद होतात. यामुळे दबाव वाढतो. एक तर तुम्ही अँकरची भूमिका पार पाडता किंवा स्ट्राइकरची भूमिका पार पाडतात.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-२० मालिकेत केएल राहुल कर्णधाराची भूमिका पार पाडेल. केएल राहुलच्या टी-२० प्रदर्शनावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. राहुल त्याच्या डावाची सुरुवात खूप धीम्या गतीने करतो, असे म्हटले जाते. कपिल देव राहुलविषयी बोलताना म्हणाले की, “जेव्हा तुम्ही केएल राहुलविषयी बोलता, जर संघाने त्याला संपूर्ण २० षटके खेळायला लावली आणि तो ६० धावा करून माघारी आला. तर हा संघासोबत त्याने केलेल्या न्याय नसेल. मला वाटते की राहुलने त्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.”
कपिल देवने पुढे बोलताना टोकाची भूमिका घेतली. त्यांनी असे सांगितेल की, जर राहुलसारख्या खेळाडूंना त्यांचा दृष्टीकोन बदलला येत नसेल, तर संघाने खेळाडू बदलले पाहिजेत. एखाद्या मोठ्या खेळाडूकडून प्रभाव पाडणे अपेक्षित असते. मोठी प्रतिष्ठा असून काही होत नाही, तुम्ही चांगले प्रदर्शन केले पाहिजे, असेही कपिल पुढे बोलताना म्हणाले
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकेच्या महिला फलंदाजाचे जबरदस्त सेलिब्रेशन, शतक ठोकल्यानंतर बॅटच दिली फेकून, Video पाहतच राहाल
रुटच्या सेंच्युरीवर ‘दादा’ही फिदा, गौरवोद्गार काढत म्हणाला, ‘काय खेळाडू आहे, दबावातही चमकलाय’