भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला संघाला वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर उभय संघांमध्ये 14 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी जखमी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी जयदेव उनाडकत याला संधी दिली गेली आहे. जयदेव तब्बल 12 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करेल. जयदेवला पुन्हा संधी मिळाल्याचे पाहून मागील पाच वर्षापासून आपली दुसरी संधी शोधत असलेल्या फलंदाज करूण नायर याने एक ट्विट केले आहे.
भारतीय संघासाठी 2010 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर उनाडकत फक्त तो एकच सामना खेळू शकला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगले कामगिरी करूनही त्याला संधी दिली जात नव्हती. आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याने मागील वर्षी एक ट्विट करत लिहिले,
‘प्रिय लाल चेंडू, मला आणखी एक संधी हवी आहे. मी नक्कीच निराश करणार नाही.’
उनाडकत 2019-2020 रणजी ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र संघाचा कर्णधार होता. तसेच, त्या हंगामात त्यांनी सर्वाधिक बळी देखील मिळवलेले. आता भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याचे हे ट्विट पुन्हा व्हायरल होतेय.
Dear cricket, give me one more chance.🤞🏽
— Karun Nair (@karun126) December 10, 2022
त्यामुळे मागील पाच वर्षापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या करूण नायर यानेही तशाच आशयाचे ट्विट केले. करूणने लिहिले,
‘प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी हवीये.’
करूण नायरने 2016 मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केलेले. त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत इतिहास रचला होता. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो केवळ दुसरा फलंदाज बनलेला. मात्र, त्यानंतर तो केवळ चार सामने भारतासाठी खेळू शकला. त्याला मागील पाच वर्षापासून संघात निवडले गेले नाही. त्याने आत्तापर्यंत 76 प्रथमश्रेणी सामने खेळताना 50 पेक्षा जास्तच्या सरासरीने 14 शतकांसह 5,436 धावा केल्या आहेत.
(Karun Nair Cryptic Tweet On Team India Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीएमडीटीए- केपीआयटी- ओडीएमटी नटराज ब्रॉन्झ सिरिज टेनिस स्पर्धेत राज दर्डा, परी हेंगले यांना विजेतेपद
लिटन दासचे इशान किशनविषयी मोठे विधान, केएल राहुल म्हणाला…