Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोच कोहली! बॅडपॅचमधून चाललेल्या राहुलच्या मदतीला धावला विराट; महत्त्वाच्या सामन्याआधी दिल्या मोलाच्या टिप्स

November 1, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/CricketMAN2

Photo Courtesy: Twitter/CricketMAN2


टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध त्यांचा चौथा सामना खेळेल. भारताने पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि संघ ब गटाच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकला, तर भारताचे उपांत्य सामन्यातील तिकिट पक्के होऊ शकते. या सामन्यात सर्वांची नजर संघाचा सलामीवीर व उपकर्णधार केएल राहुल याच्यावर असेल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी राहुलने आपल्या सर्वात अनुभवी साथीदाराकडून टिप्स घेतलेल्या आहेत.

टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आपले पहिले दोन सामने जिंकले होते. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागलेला. या सर्वांमध्ये राहुलचे अपयश ठळकपणे दिसून आलेले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो 4 तर नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी नऊ धावा करण्यात यशस्वी ठरलेला. त्याच्या याच खराब फॉर्ममूळे संघाची डोकेदुखी वाढली आहे.

Virat Kohli coaching classes for KL Rahul in Adelaide! #ViratKohli #KLRahul #SportsYaari pic.twitter.com/XBUbKHcTyw

— Sushant Mehta (@SushantNMehta) November 1, 2022

 

Brilliant from Virat Kohli, he is helping and having words with KL Rahul in the tough times. (Source – The Indian Express) pic.twitter.com/cyGAct7enX

— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2022

 

आपल्या या बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी राहुलने थेट संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज व सध्या अफलातून फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे मार्गदर्शन घेतले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ सराव करताना दिसून आला. त्यावेळी विराट राहुलला त्याच्या फुटवर्क तसेच फटक्यांच्या निवडीबाबत मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येतेय. विराटने या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82, नेदरलँड्सविरूद्ध नाबाद 62 व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावा काढल्या आहेत. विराटच्या याच मार्गदर्शनाचा फायदा राहुल घेतो का हे पाहणे रंजक ठरेल.

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास


Next Post
RAINA

सुरेश रैना पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस! अबू धाबी टी-10 लीगमध्ये 'या' संघासोबत केला करार

rohit sharma

अवघड असतं बाबा! संघातील खेळाडूंना असा हाताळतो रोहित? स्वतःच केला खुलासा

बांगलादेशला हलक्यात नाही घेणार भारतीय संघ! प्रशिक्षक राहुल द्रविडची मोठी प्रतिक्रिया

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143