बेंगलुरु | आज गुरुवारी राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात बेंगलोरला विजय मिळवणे अनिवार्य आहे. आज जर ते या सामन्यात पराभूत झाले तर त्यांचे या स्पर्धेतून जवळपास बाहेर गेल्यात जमा आहे.
या सामन्यात आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा पहिला खेळाडू होण्याची मोठी संधी विराट कोहलीकडे आहे. त्याने १६१ सामन्यात आजपर्यंत ४९३२ धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी ३८.८३ ची असून त्याने ३४ अर्धशतके आणि ४ शतके केली आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना असुन त्याने १७२ सामन्यात ४८५५ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
४९३२- विराट कोहली, सामने- १६१
४८५५- सुरेश रैना, सामने- १७२
४४८०- रोहित शर्मा, सामने- १७२
४२१७- गौतम गंभीर, सामने- १५४
४०३६- राॅबीन उथप्पा, सामने- १६२
महत्त्वाच्या बातम्या-
–आजचा सामन्यात बेंगलोर जर पराभूत झाले तर….
–शेवटचा सामना जिंकुनही मुंबई होऊ शकते आयपीएलमधून बाहेर
–महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा
–9 दिवसांत केएल राहुलच्या नावावर झाले दोन नकोसे विक्रम
–संघ पराभूत झाला, परंतु तो अखेरपर्यंत लढला!