इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. या हंगामात २ नवे संघ सामील होत आहेत. तसेच या हंगामापूर्वी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळे पुढीलवर्षी आयपीएलमध्ये प्रत्येक संघात मोठे बदल दिसणार आहेत. याच धरतीवर सध्या संघ कोणत्या ४ खेळाडूंना संघात कायम ठेवायचे या गोष्टींच्या विचारात आहेत. अशात असे समजत आहे की आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करणारा कर्णधार ओएन मॉर्गन संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास तयार आहे.
केकेआर मॉर्गनला कायम ठेवण्याच्या मनस्थितीत नाही आणि अशा परिस्थितीत त्याला केकेआरकडून आयपीएल २०२२ साठी कायम करणे कठीण वाटत आहे. मॉर्गनच्या खराब फॉर्ममुळे संघ व्यवस्थापनाने त्याला संघात न ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
आयपीएल २०२२ मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे आणि कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना मॉर्गनला कायम न ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.
इनसाइड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, केकेआर जवळच्या एका सूत्राने सांगितले की मॉर्गनचा फलंदाजीचा फॉर्म आयपीएल २०२१ मध्ये एक मोठी चिंता होती. तो म्हणाला की, कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करूनही, त्याच्या फलंदाजीतील घसरणीच्या कारणाने फ्रँचायझीने मॉर्गनला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लीगच्या १४व्या हंगामात मॉर्गनने १७ सामन्यात ११ च्या सरासरीने फक्त ११७ धावा केल्या. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारावर मोठी रक्कम खर्च करण्यास फ्रेंचायझी तयार नाही, असे सूत्राने सांगितले. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने आयसीसी टी२० २०२१ विश्वचषकाची उपांत्य फेरी देखील गाठली होती.
जर केकेआर संघ व्यवस्थापनाने मॉर्गनला कायम ठेवले नाही, तर आपिएल २०२२ मध्ये संघाला नवा कर्णधार मिळालेला दिसू शकतो. अहवालानुसार, मिस्ट्रीस्पिनर वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर या फिरकीपटूंना केकेआर संघात कायम ठेवू शकते. त्याच्याशिवाय पॅट कमिन्सला कायम ठेवता येईल. त्याचबरोबर आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांच्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
हा हंगाम २ एप्रिल सुरू होण्याची संभाव्य तारीख आहे हे मान्य. यावेळी १० संघ खेळणार असून एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चाहत्यापासून ते शिष्यापर्यंत..! हर्षल पटेलने शेअर केला महागुरू द्रविडसोबतचा जुना-नवा फोटो शेअर, पाहा
रोहितची फिरकी घेणं झहिरला पडलं महागात, एक मुंबईकरच आला रोहितच्या मदतीला
वॉटसनने निवडले टी२० क्रिकेटमधील टॉप-५ फलंदाज, रोहित नव्हे ‘या’ भारतीयाला दिली जागा