पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत प्राधिकरण जिमखाना संघाने संडे क्रिकेटर संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत धिरज परमबथच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर प्राधिकरण जिमखाना संघाने संडे क्रिकेटर संघाचा 12 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निनाद चौधरीच्या 22, धिरज परमबथच्या 27 तर प्रतिक कोयतेच्या नाबाद 26 धावांसह प्राधिकरण जिमखाना संघाने 20 षटकात 7 बाद 142 धावा केल्या. 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धिरज परमबथ, समाधान माने व अमेय शेवळे यांच्या अचूक गोलंदाजीने संडे क्रिकेटर संघाचा डाव 20 षटकात 6 बाद 130 धावांत रोखला. 12 चेंडूत 27 धावा व 15 धावात 2 गडी बाद करणारा धिरज परमबथ सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी
प्राधिकरण जिमखाना- 20 षटकात 7 बाद 142 धावा(निनाद चौधरी 22(36, 1×4), धिरज परमबथ 27(12, 4×4, 1×6), प्रतिक कोयते नाबाद 26(18, 2×6), सचिन सावंत 2-34, नरेंद्र चुरी 1-16) वि.वि संडे क्रिकेटर- 20 षटकात 6 बाद 130 धावा(संजय गराड नाबाद 44(44, 6×4, 1×6), मयुरेश पंचपोर 18(21, 2×4, 1×6),प्रसेन मोरे नाबाद 20(15, 2×4), धिरज परमबथ 2-15, समाधान माने 2-19, अमेय शेवळे 2-32) सामनावीर- धिरज परमबथ
प्राधिकरण जिमखाना संघाने 12 धावांनी सामना जिंकला.