कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी : शुभम शिदनाळे याने माती विभागातून आगेकूच करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आगेकूच केली. वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला पराभूत करताना धक्कादायक निकाल नोंदविला.
माती विभागातून चुरशीच्या लढतीत वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माऊली जमदाडेला ९-४ असे पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली. सुरुवातीलाच सिकंदरने माउलीवर ताबा घेताना २ गुण मिळविले. माऊली जमदाडेने पहिल्याच प्रयत्नात दुहेरी पट काढताना थेट ४ गुणाची कमाई केली. त्यानंतर सिकंदर शेखने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत माउलीचा ताबा घेत २ गुणांची कमाई केली. त्यानंतर माऊली जमदाडेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला परंतू हा डाव उलटून टाकताना सिकंदरने ४ गुणाची कमाई केली. त्यानंतर दोघांनी देखील एकमेकांवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू यात माऊली जमदाडे याला बाहेर वर्तुळाच्या बाहेर ढकलत सिकंदरने गुणाची कमाई करताना विजय मिळविला.
माती विभागात कोल्हापूरच्या शुभम शिदनाळे याने ठाणेच्या अप्पा सरगरला चीतपट केले. लढतीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत शुभमने ३ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर शुभमने आप्पा सरगरला चितपट करताना विजय साकारला.
५७ किलो वजनी गटाच्या माती विभागात सोलापूरच्या सौरभ इंगवेने सुवर्णपदक, सांगलीच्या रोहित तामखेडेने रौप्य तर पुणे जिल्हा संघाच्या ओमकार निगडेने कांस्य पदक पटकावले.
८६ किलो माती विभागात भांडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेला सुवर्णपदक, वाशीमच्या सचिन पाटीलला रौप्य तर सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेला रौप्यपदक देण्यात आले.
86 किलो वजनी गट माती विभाग
प्रथम – अर्जुन काळे, भंडारा
द्वितीय – सचिन पाटील, वाशीम
तृतीय – राहुल काळे, सोलापूर
57 किलो वजनी गट माती विभाग
प्रथम – सौरभ इगवे सोलापूर
द्वितीय- रोहित तामखेडे, सांगली
तृतीय – ओमकार निगडे, पुणे जिल्हा
(Maharashtra Kesari 2023 Mauli Jamdhade Lost Sikandar Shaikh Won)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिहान, रिवाने बाजी मारली; धीरूभाई अंबानी शाळेला टेनिसचे सांघिक विजेतेपद
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’