देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता राज्य संघटनांनी आपले संघ घोषित करण्यासाठी सुरुवात केलीये. मागील काही वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या महाराष्ट्र संघाची देखील संघनिवड जाहीर झाली असून, भारतीय संघाचे सदस्य असलेले ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांचा संघात समावेश केला गेला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव संघाचे नेतृत्व करेल.
https://twitter.com/MaharashtraCric/status/1578748121735368707?t=j1Xa-t39yE9p5XVSRmK4Jg&s=19
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून ही संघ निवड जाहीर करण्यात आली. भारतीय संघासाठी खेळणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सलग दुसऱ्या वर्षी संघाचे नेतृत्व करेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असलेला राहुल त्रिपाठी हादेखील संघात सामील आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यांसाठी हे खेळाडू उपलब्ध नसतील. त्यामुळे अनुभवी सत्यजित बच्छाव संघाचे नेतृत्व करताना दिसेल. 11 ऑक्टोबरपासून स्पर्धेला मोहाली येथे सुरुवात होणार आहे.
या तिघांव्यतिरिक्त संघात अक्षय पालकर, शमशुझमा काझी, नौशाद शेख व अझीम काझी या अनुभवी खेळाडूंचा देखील संघात समावेश आहे. या व्यतिरिक्त या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या अंडर नाईन्टीन विश्वचषकात भारताच्या विजय संघाचा भाग असलेले राजवर्धन हंगारगेकर, विकी ओस्तवाल व कौशल तांबे यांना संधी दिली गेली आहे. रामकृष्ण घोष, पवन शहा व सिद्धेश वीर प्रथमच या स्पर्धेत खेळताना दिसतील.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, सत्यजित बच्छाव, अक्षय पालकर, शमशुझमा काझी, नौशाद शेख, अझीम काझी, राजवर्धन हंगारगेकर, विकी ओस्तवाल, कौशल तांबे, रामकृष्ण घोष, पवन शहा, सिद्धेश वीर, मनोज इंगळे, दिव्यांग हिंगणेकर, यश क्षीरसागर, यश नहार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! विश्वचषकात ‘या’ दिग्गजाने भारतीय खेळाडूंना दिलेला सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला, वाचाच
पीएमडीटीए आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी स्पर्धेत अहान भट्टाचार्य, शर्विल गंगाखेडकर यांची आगेकूच