वेस्ट इंजिडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड याला विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. त्याच्या फलंदाजीपुढे क्रिकेटविश्वातील मोठमोठे गोलंदाज फिके पडतात. त्याच्या अशाच एका धमाकेदार खेळीचा नमुना क्रिकेटरसिकांना शनिवारी (१ मे) पाहायला मिळाला. फिरोजशहा कोटला स्टेडियम, दिल्ली येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात आयपीएल २०२१ सत्ताविसावा सामना झाला.
या सामन्यात नाबाद ८७ धावांची तडाखेबंद खेळी करत त्याने संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाफकडून त्याचे भन्नाट स्वागत करण्यात आले.
मुंबई-चेन्नई या बहुचर्चित सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. त्यांनी निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २१८ धावा केल्या होत्या. दरम्यान पोलार्डने २ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यातही या दोन्ही विकेट्स त्याने एकाच षटकात मिळवल्या होत्या. डावातील १२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने फाफ डू प्लेसिसला जसप्रीत बुमराहच्या हातून झेलबाद केले होते. त्यापुढील चेंडूवर सुरेश रैना कृणाल पंड्याच्या हाती झेल देत बाद झाला होता.
याबरोबरच चेन्नईच्या २१९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्यातही पोलार्डचा मोलाचा वाटा राहिला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. या खेळीसाठी त्याने ८ षटकार आणि ६ चौकार मारले होते.
एकाकी झुंज देत संघाला विजय मिळवून दिल्यानंतर संघ सहकाऱ्यांनी ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर त्याचे तोंडभरुन कौतुक केले. प्रशिक्षकांनी त्याच्याशी हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी त्याला मिठी मारत त्याची पाठ थोपटली. सूर्यकुमार यादव तर उडी मारुन त्याच्या गळ्याला पडला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
𝐒𝐭𝐨𝐩. 𝐖𝐫𝐢𝐭𝐢𝐧𝐠. 𝐔𝐬. 𝐎𝐟𝐟. 🔥
The Big Man gave a roaring reaction on his return to the dressing room after his heroics on the field! 💪😎#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #Pollard #MIvCSK @KieronPollard55 pic.twitter.com/FmdfsWDWnT
— Mumbai Indians (@mipaltan) May 2, 2021
खात्यात नोंदवला नवा किर्तीमान
फलंदाजी आणि गोलंदाजीतील पोलार्डच्या दमदार प्रदर्शनामुळे तो ‘मॅन ऑफ द मॅच’ अर्थात ‘सामनावीर’ ठरला. यासह मुंबई विरुद्ध चेन्नई या हाय व्होल्टेज सामन्यात सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. त्याच्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांचा क्रमांक लागतो. ते प्रत्येकी ३ वेळा मुंबई-चेन्नई सामन्यात सामनावीर राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला ६ पैकी ६ चेंडू खेळायचे होते, त्यामुळे शेवटच्या षटकात…,’ कायरन पोलार्डचा मोठा उलगडा
चेन्नईविरुद्ध ‘ती’ कृती करत क्विंटन डी कॉक पुन्हा झाला ट्रोल; चाहत्यांनी म्हटले, ‘जन्मजात चीटर!’