भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा दुसरा टी२० सामना सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडीवर आहे. या सामन्यात विजय मिळवून, मालिकाविजय साजरा करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करणारा यष्टीरक्षक मॅथ्यू वेड याने तुफानी फलंदाजी केली. मात्र, तो काहीसा कमनशिबी ठरला. ज्या चेंडूवर त्याचा विराटकडून झेल सुटला, त्या चेंडूवर त्याला दुर्दैवीरीत्या धावबाद होऊन तंबूत परतावे लागले.
भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार यष्टीरक्षक मॅथ्यू वेड सलामीला आला. डार्सी शॉर्ट व वेड यांनी ऑस्ट्रेलियाला तुफानी सुरुवात देत चार षटकांत ४० धावांची लूट केली. प्रामुख्याने वेड चांगलीच फटकेबाजी करत होता. शॉर्ट पाचव्या षटकात बाद झाल्यानंतरही वेडने दुसर्या टोकाने भारतीय गोलंदाजांची धुलाई चालू ठेवली. लवकरच त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
दुर्दैवीरीत्या झाला धावबाद
वेड भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असतानाच वॉशिंग्टन सुंदर ऑस्ट्रेलियाच्या डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आला. त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वेड चकला आणि बॅटची कड घेऊन चेंडू वर उडाला. कव्हर्समध्ये उभा असलेला भारतीय कर्णधार विराट कोहली हा झेल सहज टिपेल, असे वाटत असतानाच त्याने तो झेल सोडला.
What a calamity! #AUSvIND pic.twitter.com/2NeeTB4ixT
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2020
झेल सुटला, तरी वेड चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पुढे आला आणि विराटने संधी साधली. झेल सुटल्यानंतरही त्याने निराश न होता, पटकन चेंडू उचलून यष्टीरक्षक केएल राहुलकडे फेकला. त्यावेळी वेड अर्ध्या खेळपट्टीवर असल्याने तो सहजरीत्या धावबाद झाला. वेडने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत ३२ चेंडूत ५८ धावा फटकावल्या. यात तब्बल १० चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाने उभारली मोठी धावसंख्या
कर्णधार वेड व अनुभवी स्टीव स्मिथ यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकात १९४ धावा काढल्या. भारताकडून टी नटराजन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने, १९ धावा देत २ बळी आपल्या नावे केले. भारताला टी२० मालिका आपल्या नावे करण्यासाठी १९५ धावा जमवल्या लागतील.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video
VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर