इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. या सामन्यात विजय मिळवून देण्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे, सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, माजी इंग्लिश कर्णधाराने देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला होता, कारण इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आणला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघांकडून सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने शतकी खेळी करत इंग्लंडला ४३२ धावांवर पोहचवले होता. यासह इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती.
जो रूटने १६५ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची खेळी केली होती. हे त्याच्या कारकिर्दीतील २३ वे तर या मालिकेतील तिसरे शतक होते. ही अप्रतिम खेळी पाहून मायकल वॉन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
ज्यामध्ये ते बालपणीच्या जो रूटला सन्मानचिन्ह देताना दिसून येत आहेत. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, “मला तुझा अभिमान वाटतो जो रूट. हे पाहून खूप आश्चर्य होते की, तू स्वतःमध्ये परिवर्तन करून एक महान खेळाडू झाला आहेस.” रूटने पहिल्या दोन्ही सामन्यात देखील शतक झळकावले होते. तसेच तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
वॉन यांचा विक्रम टाकला मागे
हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने विजय मिळवल्याने रुट इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे. त्याच्यानावावर कर्णधार म्हणून २७ विजयांची नोंद झाली आहे. हा विक्रम करताना त्याने वॉन यांना मागे टाकले आहे. वॉन यांनी २६ कसोटी सामन्यांत इंग्लडचे नेतृत्व करताना विजय मिळवले होते.
https://www.facebook.com/100044209610874/posts/400252028125114/?d=n
भारतीय संघाचा १ डाव ७६ धावांनी पराभव
या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाने ३५४ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी मजबूत पकड बनवल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करतील अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा ९१ धावा करत माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली देखील ५५ धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे अवघ्या १० तर रिषभ पंत १ धाव करत स्वस्तात माघारी परतले. शेवटी जडेजाने ३० धावांची झुंज दिली. परंतु, ही झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अँडरसनने शिकवलेल्या वॉबल ग्रिपचा वापर सामन्यात केला अन् त्याचा फायदाही झाला’, रॉबिन्सनचा खुलासा
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी वेळापत्रात बदल; ‘इथे’ आणि ‘या’ दिवसापासून होणार सामने
दुखापतीमुळे जडेजाचे चौथ्या कसोटीत खेळणे अनिश्चित, बड्या क्रिकेटरने सुचवली ‘ही’ २ नावे