वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला पराभूत केले. अंतिम सामन्यात भारतीय संघ 6 विकेट्सने पराभूत झाला आणि इतिहासातील तिसरा विश्वचषक जिंखण्याची संधी भारताने गमावली. ऑस्ट्रेलियासाठी ही वनडे विश्वचषकाची सहावी ट्रॉफी ठरली. असे असले तरी, मिचेल मार्श याने विश्वचषक जिंकल्यानंतर ट्रॉफीचा अपमान केला, असे अनेक भारतीयांना वाटले. अता स्वतः मार्शने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिमाखात विजय मिळवला. विजयानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने अक्षरशः विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो समोर आला. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांच्या मते मार्शने विश्वचषक ट्रॉफीचा अपमान केला, तर काहींनी असेही म्हटले की, ऑस्ट्रेलियन संस्कृती त्यांना असे वागण्याची परवानगी देते.
मिचेल मार्श आणि विश्वचषक ट्रॉफीबाबत पेटलेला हा वाद आता कुठेतरी शांत होताना दिसत होता. पण तितक्यात मार्शने आपली प्रतिक्रिया देत एकप्रकारे पुन्हा ठिणगी टाकली. मार्शच्या वक्तव्यावरून त्याला ट्रॉफीवर पाय ठेवण्याबाबत कुठलीच खंत नाही, असेच दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मार्शला मार्शला प्रश्न विचारला गेला की, तू पुन्हा कधी विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवशील का? या प्रश्नाचे उत्तर मार्शने दिले की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, शक्यतो हो मी पाय ठेवेल. स्पष्टपणे सांगायचे झाले तर, या फोटोत अपमान होण्यासारखे काहीच नव्हते. मी यावर खूप जास्त विचार केला नाहीये. सोशल मीडियावर देखील मी याविषयी जास्तकाही पाहिले नाही. अनेकांनी मला सांगितले की, आता या चर्चा संपल्या आहेत. पण यात चर्चा करण्यासारखे काहीच नव्हते.”
दरम्यान, मार्शला जरी आपण काही चुकीचे केले, असे वाटत नसले, तरी अनेक लाखो भारतीय चाहत्यांच्या भावना त्याने दुखापल्या होत्या. मुलाखतीत मार्शने भारतीय चाहत्यांच्या भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता, असेही स्पष्ट केले. (Mitchell Marsh’s first reaction to stepping on ICC World Cup)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024पूर्वी घोंगावलं RCBच्या पठ्ठ्याचं वादळ! विजय हजारे ट्रॉफीत 81 बॉलमध्ये पाडला ‘एवढ्या’ धावांचा पाऊस
स्टेडियम प्रशासनाचा ढिसाळ कारभार! निर्णायक सामन्यासाठी लाईटच नाही, थकवलंय कोट्यावधींच वीजबील