‘या’ युवा गोलंदाजाला ४ महिन्यात बनवेन भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, मोहम्मद शमीचा दावा

'या' युवा गोलंदाजाला ४ महिन्यात बनवेन भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, मोहम्मद शमीचा दावा

मोहम्मद शमीच्या मते, तो वेगवान गोलंदाज मोहसिन खानला चार महिन्यांमध्ये भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू बनवू शकतो. मोहसिनचे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी यांनी दावा केला की, स्वतः मोहम्मद शमीने त्यांच्यासोबत बोलताना असे म्हटले होते. आयपीएल २०२२ हंगामात मोहसिनने उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर सिद्दीकी यांनी हा खुलासा केला आहे.

मोहसिनची गोलंदाजी तर सर्वांनी पाहिली, पण त्याचे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी यांच्या मते तो भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू देखील बनू शकतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोहम्मद शमी (Mohammad Shami) यानेही त्यांच्यासोबत बोलताना मान्य केले होते की, मोहसिन खान (Mohsin Khan) सर्वश्रेष्ट अष्टपैलू बनू शकतो. सिद्दीकीच्या मते केएल राहुलला देखील मोहसिनची फलंदाजी चांगल्या पद्धतीने माहिती आहे.

सिद्दीकी म्हणाले की, “जेव्हा लिलाव सुरू होता, तेव्हा मी शमीसोबत त्याच्या फार्महाउसवर बसलो होतो. त्याला निवडले गेले आणि मोहसिनला देखील. त्यावेळी शमी म्हणाला की, जर तुम्ही फक्त चार महिने दिले, तर मी त्याला भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू बनवेल. तो खूप चांगला फलंदाज आहे. याआधी केएल राहुलही म्हटला होता की, मोहसिनला खेळाची चांगली समज आहे.”

“गोलंदाज अनेक असतात, पण तुमची समज चांगली पाहिजे. तुम्हाला हे माहिती पाहिजे की, कोणत्या खेळाडूविरोधात कोणता चेंडू वापरायचा. आज शमी एक मोठा गोलंदाज आहे, पण तो उभरत्या खेळाडूंना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो,” असेही सिद्दीकी पुढे बोलताना म्हणाले.

वेगवान गोलंदाज मोहसिन खान आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळत होता. यावर्षी त्याने अप्रतिम प्रदर्शन करून सर्वांना प्रभावित केले. हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने २ षटकात १८ धावा खर्च केल्या आणि त्याला संघातून वगळले गेले. पण नंतर जेव्हा त्याने पुनरागमन केले, तेव्हा शेवटच्या ८ सामन्यांमध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या. संपूर्ण हंगामात त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ५.५७ राहिला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘पहिला सामना हारूनही पंत खुश असेल’, दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचे गजब वक्तव्य

प्रिटोरियसच्या खेळीवर ‘पटेली’ गाजवणाऱ्या हर्षलचा व्हिडिओ होतोय व्हायरल, तुम्ही पाहिला का?

दुसऱ्या सामन्यासाठी Cuttack शहरात पोहोचताच भारतासह दक्षिण आफ्रिकी खेळाडूंचे जंगी स्वागत, Video Viral

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.