गतवर्षी निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत १० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. परंतु शनिवारी (१ मे) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाने ४ गडी राखून पराभूत केले होते. हा सामना झाल्यानंतर कर्णधार एमएस धोनीने सामना कुठे गमावला याबाबत भाष्य केले होते.
धोनी म्हणाला की, “ही एक चांगली खेळपट्टी होती. फरक फक्त योजना प्रत्यक्षात मैदानावर अंमलात आणण्याचा होता. मला असे वाटते की, गोलंदाजांना दोष देण्याऐवजी आमचे क्षेत्ररक्षण खूप वाईट होते. आम्ही महत्वाच्या क्षणी झेल सोडले होते. गोलंदाजांनाही अनेकदा रणनितीनुसार गोलंदाजी करता आली नाही. त्यांनी खूप खराब चेंडू फेकले. परंतु जेव्हा तुम्ही गुणतालिकेत टॉपला असता, तेव्हा अशा पराभवाने तुम्हाला इतके दुःख होत नाही.”
दबावात खूप काही शिकायला मिळतं..
तसेच तो पुढे म्हणाला की, “या सामन्यात जेव्हा अंमलबजावणीची वेळ आली होती, तेव्हा आम्ही चुकलो होतो हे आम्हाला माहित आहे. जेव्हा क्रीजवर चांगले फलंदाज खेळत होते ज्यांनी मोठे फटके लावले होते. तेव्हा योग्य योजना अंमलात आणणे महत्त्वाचे असते. या खेळपट्टीवर शॉट खेळणे सोपे जात होते. या स्पर्धेत आपण जिंकता आणि काही जवळील सामने गमावता देखील. जर एक किंवा २ षटकार लागले नसते. तर २० व्या षटकात हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो. पराभवाने दुःख होते. पण संघाचे मनोबल कमी झाले नाहीये. जेव्हा तुम्ही दबावात असता तेव्हा खूप काही शिकता.”
या सामन्यात पराभूत झाल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत १० गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स संघ ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या कर्णधारासह हैदराबादचा होणार ‘सनराईज’, पाहा विलियम्सन आणि सॅमसनचे संघ?
कृणालच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमापार, मग काय गोलंदाज बोल्टचा चढला पारा; बघा व्हिडिओ
मुंबई-चेन्नई सामन्यात कायरन पोलार्ड आणि सॅम करनमध्ये चकमक, डोळे वटारत काढली खुन्नस