इंडियन प्रीमियर लीग २०२२चा रोमांच शिखरावर पोहोचला आहे. सर्व सहभागी १० फ्रँचायझी विजयासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. परंतु जो संघ शानदार प्रदर्शन करतोय, विजय त्यांच्याच वाट्याला येत आहे. एकीकडे नव्या लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स संघांचा विजयरथ सुस्साट सुटला आहे. तर दुसरीकडे ५ वेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघ पहिल्या विजयासाठी झगडतो आहे.
हंगामातील सुरुवातीचे सलग ६ सामने गमावलेला मुंबई संघ (Mumbai Indians) अद्याप त्यांच्या विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. अशात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आपला एक धाकड शिलेदार हातून निसटल्याचे वाईट वाटत असेल. हा खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock).
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
डी कॉक गेले ३ हंगाम मुंबई संघाचा भाग होता. २०१९ साली तो मुंबई संघासोबत जोडला गेला होता. या पहिल्याच हंगामात शानदार खेळ दाखवत त्याच्या बॅटमधून १६ सामन्यांमध्ये ५२९ धावा निघाल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकेही केली होती. त्यानंतर वर्ष २०२० मध्ये त्याने मुंबईसाठी ५०३ धावा केल्या होत्या. तर आयपीएल २०२१ मध्येही त्याने २९७ धावा केल्या होत्या. याखेरीज यष्टीरक्षक म्हणूनही त्याचा वाटा मोलाचा होता. त्याने यष्टीमागे संघासाठी २ वर्षांत मिळून ४० विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याच्या ३४ झेल आणि ६ यष्टीचीतचा समावेश होता.
परंतु आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात लखनऊ (Lucknow Supergaints) संघाने त्याला ६ कोटी ७५ लाख रुपयांमध्ये खरेदी करत आपल्या संघात सामील केले आहे. तो लखनऊकडून शानदार प्रदर्शनही करत आहे. आतापर्यंत लखनऊकडून ६ सामने खेळताना त्याने २१२ धावा फटकावत संघाला ४ सामने जिंकून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यामुळे आता मेगा लिलावात डी कॉकसारख्या खेळाडूला खरेदी न करण्याचा पश्चाताप मुंबईला नक्कीच होत असावा. जर तो संघासोबत असता तर संघाची सलामीची चिंता मिटली असती. परिणामी सध्या संघाची स्थिती अशी नसती, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते
हार्दिकच नाही, तर ‘हे’ ४ खेळाडूही करू शकतात टीम इंडियात कमबॅक; फक्त आयपीएलमध्ये केलाय धमाका
ये हुई ना बात! जुना विराट परतला, वॉर्नर बाद झाल्यानंतर कोहलीचे आक्रमक सेलिब्रेशन पाहून सुखावले चाहते