तमिळनाडूने रविवारी (३१ जानेवारी) बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आपल्या नावे केली. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहत त्यांनी दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. या विजयानंतर तमिळनाडू संघ व कर्णधार दिनेश कार्तिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तमिळनाडूचा अनुभवी सलामीवीर मुरली विजय यानेदेखील ट्विटरवरून आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे.
तमिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने बडोद्याच्या संघाचा एकतर्फी पराभव केला. बडोदा संघाने दिलेले १२१ धावांचे आव्हान तमिळनाडूने दोन षटके राखून तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. युवा फिरकीपटू एम सिद्धार्थ तमिळनाडूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सिद्धार्थने आपल्या ४ षटकात ४ महत्त्वपूर्ण बैठक घेत बडोद्याच्या धावसंख्येला लगाम घातला. तमिळनाडूचे हे या स्पर्धेचे दुसरे विजेतेपद आहे.
मुरली विजयने केले अभिनंदन
दिनेश कार्तिक कर्णधार असलेल्या तमिळनाडू संघाचे या विजेतेपदाबद्दल सर्वजण अभिनंदन करत आहेत. तमिळनाडूचा अनुभवी सलामीवीर मुरली विजयने देखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या संघाचे अभिनंदन केले. मुरली विजयने ट्विट करताना लिहिले, ‘वेल डन बॉईज, तुम्ही उत्तम सांघिक कामगिरी करून दाखवली. प्रशिक्षक गटाचे देखील धन्यवाद’
Well done boys ! Great team effort .. @TNCACricket . Special mention to our support staff ✌🏽🤙🏽 @DineshKarthik @Jagadeesan_200 👍🏽
— Murali Vijay (@mvj888) January 31, 2021
विजयने या ट्विटमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटना, कर्णधार दिनेश कार्तिक व अनुभवी फलंदाज एन जगदीशन यांना टॅग केले आहे. त्यानंतर, दिनेश कार्तिक ने हे ट्विट रिट्विट देखील केले.
चाहत्यांनी केले ट्रोल
दिनेश कार्तिक व मुरली विजय यांच्यात याआधी काही वाद होता. दिनेशची पहिली पत्नी निकिता हिने दिनेशपासून घटस्फोट घेत, मुरली विजयशी लग्न केले होते. या ट्वीटनंतर मात्र, चाहत्यांनी काही गमतीदार टिप्पण्या या ट्वीटखाली केल्या आहेत. एका चाहत्याने मीम शेअर करत लिहीले, ‘आता डिकेसोबतचा माझा वाद संपला आहे. आता तो माझा पक्का मित्र बनला.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले, ‘आता तू दिनेश कार्तिकचे मन नाराज करू नको.’ एका ट्विटर खात्यावरून रामायण मालिकेत राम व रावणाची भूमिका करणारे कलाकार हातमिळवणी करत असल्याचे छायाचित्र शेअर केले आहे.
तमिळनाडूसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळतो मुरली विजय
मुरली विजय तमिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तसेच त्याने जवळपास दहा वर्ष भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटदेखील खेळले आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला करारमुक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
कोहलीच्या कसोटी आणि वनडेतील नेतृत्वावर मला कधीच आक्षेप नव्हता, भारताच्या माजी सलामीवीराचे वक्तव्य
धोनीने संधी न दिलेल्या खेळाडूने गाजवली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
मुंबई इंडियन्समध्ये आहे ही कमतरता, आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य