भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. तसेच अनेकदा गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले; विशेषत: मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये. तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप यशस्वी ठरला. त्याने 2007 च्या टी20 आणि 2011 चा वनडे विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलला. पण असे असतानाही त्याला एका गोष्टीचे वाईट वाटते की त्याला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटप्रमाणे कसोटीमध्ये जास्त संधी मिळाली नाही.
युवराजने टाईम्स नाऊला सांगितले की ‘अनुभव, चांगले किंवा वाईट असो, ते आपल्या शिकण्याच्या आणि विकासाचा एक भाग आहेत आणि मी त्यांची कदर करतो. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते 2011 च्या विश्वचषकापर्यंत आणि त्यानंतर कर्करोगाशी लढा देऊन नंतर मैदानावर परत येईपर्यंत मी माझ्या कारकीर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक टप्पे पाहिले आहेत आणि या अनुभवांनी मला असा व्यक्ती बनवले आहे, जसा मी आत्ता आहे.’
पुढे युवराज म्हणाला, ‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, सहकार्यांचे आणि चाहत्यांचा आभारी आहे, ज्यांनी मला प्रत्येक मार्गावर पाठिंबा दिला आहे आणि प्रेरणा दिली आहे.”
पण असे असले तरी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये 139 विकेट्स घेणारा युवराजने म्हटले आहे की त्याला जर भारताकडून आणखी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता. युवराज 40 कसोटी सामने खेळला. 2003 ला कसोटी पदार्पण केल्यानंतर युवराजने कसोटीत 3 शतकांसह 1900 धावा केल्या. तर त्याने 9 विकेट्स घेतल्या.
युवराज म्हणाला, ‘जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला असे वाटते की मला कसोटी क्रिकेट खेळण्याच्या अधिक संधी मिळायला पाहिजे होत्या. पण त्या दिवसांत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली सारख्या स्टार खेळाडूंमध्ये जागा मिळवणे कठीण होते.’
‘मधल्या फळीत जागा मिळवणे अवघड होते. शिवाय, आजच्या पिढीच्या तुलनेत, ज्यांना दहा पेक्षा अधिक कसोटी सामने खेळायला मिळतात, आम्हाला एक किंवा दोन संधी मिळायच्या. मला सौरव निवृत्त झाल्यावर माझी संधी मिळाली, पण दुर्दैवाने मला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि माझ्या आयुष्याने एक वेगळी वळण घेतले.’
युवराज म्हणाला, ‘तरीही, मी माझ्या प्रवासाबद्दल आनंदी आहे आणि माझ्या देशासाठी खेळल्याचा मला अत्यंत अभिमान आहे.”
युवराजने त्याच्या कारकिर्दीत 40 कसोटीव्यतिरिक्त 304 वनडे सामने आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. वनडेत त्याने 8701 धावा केल्या आणि 111 विकेट्स घेतल्या. तसेच टी20मध्ये त्याने 1177 धावा केल्या आणि 28 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्याने भारताविरुद्ध दिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून, आज पाकिस्तानने त्यालाच केले वॉटर बॉय
जॉंटी रोड्सपेक्षाही खतरनाक झेल घेते ही मांजर, सोशल मीडियावर झालीय सुपरस्टार
हसीन जहांला सोशल मीडियावर येतीय रेपची धमकी, जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेट जगतातील ५ महान खेळाडू, जे झाले होते वाॅटरबाॅय
या क्रिकेटरला पुढचा इयान बाॅथम असं म्हटलं जायचं, पण वैयक्तिक संकटांमुळे…
आयपीएल २०२०: शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करु शकणारे ५ क्रिकेटपटू