पुणे। राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या स्पोर्ट्स एनजीओ ‘लक्ष्य’च्या वतीने 10वेळा टेबल टेनिसचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या शरथ कमल आणि एकेरी व दुहेरी गटातील वरिष्ठ राष्ट्रीय विजेती श्रीजा अकुला यांसह सुहानी सैनी, प्राप्ती सेन आणि पृथा व्हर्टीकर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकवलेल्या आणि लक्ष्यचा मेंटॉर असलेल्या कमलेश मेहता, लक्ष्यचे अध्यक्ष सत्येन पटेल, माजी भारतीय पॅडलर सुनील बाब्रस आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव प्रकाश तुळपुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्यचे मानद सचिव सुंदर अय्यर, उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर व आशिष देसाई, खजिनदार भरत शहा, मनीष मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंच्या आयुष्यात त्याचे कुटुंब आणि शाळा या दोन गोष्टींना खूप महत्व आहे. यात बदल झाला तर आपण क्रीडा क्षेत्रात अव्वल होण्यास वेळ लागणार नाही, असे मत अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकवलेल्या आणि लक्ष्यचा मेंटॉर असलेल्या कमलेश मेहता यांनी व्यक्त केले. यावेळी फिजिओ महेंद्र गोखले, सन्मय परांजपे, मनोज पिंगळे, गायत्री वर्तक यांचाही गौरव करण्यात आला.
त्यावेळी मेहता बोलत होते. ते पुढे म्हणाले की, खेळाडूंच्या कारकीर्दीत कुटुंब आणि शाळा या दोन घटकांचा मोठा प्रभाव असतो. त्यांनी बदलायचे ठरवले तर खूप फरक पडेल. विशेष म्हणजे या बदलाला आपल्याकडे सुरवात आली आहे. त्यामुळेच आज हे असे कुमार खेळाडू पुढे येत आहेत आणि ही संख्या मोठी आहे. भविष्यात एक दिवस नक्कीच आपण क्रीडा क्षेत्रात आपला दरारा दाखवून देऊ.
खेळाडूंनी खेळायला सुरवात केली की त्याची झोकून देण्याची वृत्ती हवी. मेहनत आणि सहनशक्ती असायला हवी. एकवेळ गुणवत्ता कमी आली तरी चालेल. पण आपल्याला घडायचे आहे आणि काही तरी करू दाखवायचे आहे. त्यासाठी संयम हवा.आपल्यात बडला करण्याची मानसिकता हवी तरच तो खेळाडू घडू शकेल, असेही ते म्हणाले.
लक्ष्य सारख्या संस्था आणि सरकारही आता खेळाडूसाठी पुढे येत आहे. एक काळ असा होता की कामगिरी दाखवा मग मदत मिळेल होती. आता कामगिरी दाखवण्यासाठी मदत मिळते हा बदल नक्कीच सकारात्मक आहे. याचा खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दहावेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या शरत कमल याने देखील लक्ष्याच्या धोरणाचे कौतुक केले. अशा संस्था असल्यामुळे आज खेळाडू केवळ आणि केवळ आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करू शकतो, असे सांगितले.
आम्ही खेळायला सुरवात केली तेव्हा आम्हालाच सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावे लागत होते. आमचा प्रशिक्षक आमचा ड्रायव्हर असायचा प्रशिक्षण, मसाज, ट्रेनर अशा सर्व आघाड्यांवर तिचे असायचा. आता या बाकी गोष्टीचे महत्व कळू लागल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम घडू लागले आहेत. यासाठी लक्ष्य सारख्या संस्था आणि सरकारचे धोरण यांचे महत्व वाढते. यशस्वी होण्यासाठी आता मदत मिळते हे खूप चांगले असल्याचेही त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट
वनडेत ६ धावा देत ५ विकेट्स घेणारा खेडेगावातील सुपरस्टार ‘सुनिल जोशी’