माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. सिद्धू यांना सोमवारी (०६ जून) दुपारी पटियालाच्या तुरुंगातून चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ५८ वर्षीय सिद्धूंना यकृताच्या समस्येनंतर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी सिद्धूंना रुग्णालयात भरती करून घेतले असल्याचे समजत आहे.
सिद्धूंना रोडरेज प्रकरणात १ वर्षासाठी सश्रम तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. सिद्धूंनी २० मे रोजी कोर्टापुढे आत्मसमर्पण केले होते, ज्यानंतर त्यांना पटियालाच्या सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले होते.
जवळपास २ आठवड्यांपूर्वी सिद्धूंना मेडिकल तपासणीसाठी पटियालाच्या राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले होते. तब्येतीशी झगडत असल्याने सिद्धूंनी कारावासात विशेष आहाराचीही मागली केली होती. सिद्धू गहू, साखर, मैदा अशा खाद्यपदार्थांनी बनलेले अन्न खात नाहीत. ते जांभूळ, पपई, पेरू, डबल टोंडचे दुध पितात. सिद्धू फक्त असे अन्न खाऊ शकतात, ज्यामध्ये फायबर किंवा कार्बोहायर्डेटचा समावेश नसेल, असे त्यांचे वकिल एचपीएस वर्मा यांनी सांगितले होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिद्धूंना एम्बोलिज्म नावाचा आजार आहे. तसेच त्यांना यकृताशी संबंधित रोगही झाला आहे. यामुळे त्यांनी २०१५ मध्ये दिल्लीतील एका रुग्णालयात एक्यूप डीप वेन थ्रॉम्बोसिचे (DVT) उपचारही केले होते. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शिरामध्ये रक्ताची गुठळी तयार होऊ लागते, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
‘सावधान, आम्ही येतोय!’ मालिकेपूर्वी वेस्टइंडिजच्या कर्णधाराचा पाकिस्तान संघाला इशारा