चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ओमानने मुंबईचा २ गडी राखून पराभव केला. त्यामुळे त्यांनी मालिकेतील पहिला विजय नोंदवत मालिका २-१ अशी आणली आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघ ५० षटकांत २३९ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ओमानच्या संघाने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत विजय मिळवला. त्यामुळे ओमानची धावसंख्या ८ विकेटवर २४४ अशी झाली.
यशवी जयस्वालने पुन्हा एकदा मुंबई संघासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने ११६ चेंडूत ९० धावा केल्या. त्याच्याशिवाय शम्स मुलानीची चांगली खेळी केली आणि त्याने ६६ चेंडूत ५५ धावा केल्या. अमन खानने १९ चेंडूत ३१ धावा केल्याने संघाची धावसंख्या २३९ धावांवर नेला. मात्र, शेवटच्या चेंडूपर्यंत संघ सर्वबाद झाला. ओमानसाठी कलीमुल्लाहने ९ धावांत २ बळी घेतले. त्याच्याशिवाय अयान खान आणि मोहम्मद नदीमने २-२ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात खेळताना अयान खानने ओमानसाठी चांगली फलंदाजी केली. खेळपट्टीवर टिकून खेळताना त्याने ९१ धावा केल्या. किंतु, त्याची ही खेळी खूप संथ होती आणि त्यासाठी त्याने १३५ चेंडूंचा सामना केला. त्याच्याशिवाय मोहम्मद नदीमनेही ५५ धावांची खेळी खेळली. सूरज कुमारनेही महत्त्वाचे योगदान देत संघासाठी २८ धावा केल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चालला. शेवटच्या चेंडूवर ओमानला २ धावांची गरज होती, पण त्यांच्या फलंदाजाने षटकार ठोकत संघाची धावसंख्या ८ बाद २४४ पर्यंत नेला आणि सामना जिंकला. मुंबईकडून मोहित अवस्थीने सर्वाधिक २ बळी घेतले.
𝐖𝐇𝐀𝐓 𝐀 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇. 𝐖𝐇𝐀𝐓 𝐀 𝐖𝐈𝐍. 𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐇𝐀𝐒 𝐁𝐄𝐄𝐍 𝐂𝐑𝐄𝐀𝐓𝐄𝐃! 👏🔥#OMNvMUM #OneTeam #Cricket #Onedaycricket #OneDay #Oman #TeamOman #OmanCricket #Mumbai #MumbaiRanjiTeam pic.twitter.com/1JnIU14OJX
— Oman Cricket (@TheOmanCricket) September 2, 2021
ओमानच्या संघाने मुंबईला टी-२० मालिकेत पराभूत केले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ओमानने जिंकला होता. यानंतर पुढील सामना मुंबईने जिंकला. शेवटच्या सामन्यात ओमानने विजयाची नोंद करून मालिका जिंकली होती. टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ओमानने मुंबईला त्यांच्या देशात खेळण्यासाठी बोलावले होते. तयारीच्या दृष्टीने ही मालिका त्यांच्यासाठी महत्वाची तसेच सर्वोत्तम ठरेल अशी आशा ओमान क्रिकेट बोर्डला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जार्वो आला अन् थेट पळत जाऊन बेअरस्टोला धडकला, भारताचा ब्रिटिश चाहता तिसऱ्यांदा घुसला मैदानात
आयर्लंडची ऐतिहासिक कामगिरी, झिम्बाब्वे संघाला पराभूत करत टी२० मालिका घातली खिशात
टी२० विश्वचषकात रोहित घेणार कर्णधार विराटची जागा? हेड कोच शास्त्रींनी दिले ‘असे’ उत्तर