इंग्लंड संघ सध्या सात सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी, 23 सप्टेंबरला कराचीमध्ये खेळला गेला. इंग्लंडने हा सामना 63 धावांनी जिंकला. सामना सुरू असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रउफ आणि इंग्लंडचा हॅरी ब्रुक यांच्यात असे काही घडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्रुकला गंभीर दुखापत होऊ शकत होती, पण सुदैवाने तसे झाले नाही. तसेच रउफने देखील खेळाडू वृत्तीचा एक उत्कृष्ट नमुना सादर केला.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना मध्यक्रमातील फलंदाज हॅरी ब्रुक (Harry Brook) याला दुखापत झाली असती, पण तो थोडक्यात बचावला. हारिस रउफ (Haris Rauf) या 17 षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील चौथा चेंडू त्याने बाउंसर टाकला होता. ब्रुकने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्याला गतीचा अंदाज आला नाही. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो गुडघ्यावर बसला होता, पण चेंडू अचानक बाउंस झाला आणि हेलमेटमध्ये अडकला.
हा प्राकर पाहून स्वतः ब्रुक देखील हैराण झाला होता. ही घटना घडताना यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान जवळच उभा होता आणि गोलंदाज रउफ देखील धावात ब्रुकजवळ आला. दोघांनी ही प्रसंग गमतीत घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तानच क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून व्हिडिओ शेअर केला गेला आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.
"Caught in the grille"
Brook gets a hug from Rauf after the sharp bouncer ????#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/UZRljMQt9C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 23, 2022
दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर पाकिस्तानने मालिकेतील तिसरा पराभव स्वीकारला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट्सच्या नुकसानावर 221 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ मात्र 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 158 धावांपर्यंत मजल मारू शकला. ब्रुकने अवघ्या 35 चेंडूत 81 धावांची नाबाद खेळी केली. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेरच्या सामन्यात झूलनला इंग्लंडचा ‘गार्ड ऑफ ऑनर’! पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
‘मी विजयाचे श्रेय घेत नाही…’, सामना जिंकल्यानंतर कार्तिकने रोहितचेच केले कौतुक
एमएसएलटीए बी1आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत एकेरीत मानस धामणे व श्रुती अहलावत यांना विजेतेपद