आशिया चषक 2023साठी पाकिस्तान संघाची घोषणा झाल्यानंतर आता नवा वाद पाहायला मिळत आहे. माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त केले. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी त्यांनी आशिया चषक आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. यामध्ये वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीला स्थान न मिळाल्याने तो भडकला आहे.
पाकिस्तानी संघाच्या घोषणेनंतर माजी खेळाडू रशीद लतीफने या संघात समाविष्ट असलेल्या वेगवान गोलंदाजांबाबत एक ट्वीट केले आहे. त्यावर शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) याने आपला राग काढत लतीफ आणि पीसीबी विरोधात निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आशिया चषक संघात निवड न झाल्याबद्दल रशीद लतीफच्या ट्विटला उत्तर देताना दहानी याने लिहिले की, “दहानी हा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नाही असे मला वाटत आहे. एकाही पत्रकार किंवा क्रिकेट विश्लेषकाने निवडकर्त्यांना प्रश्न विचारण्याची किंवा ही आकडेवारी दाखवण्याची हिंमत केली नाही.” असे तो म्हणाला.
रशीद लतीफच्या ट्विटला रिट्विट करत दहनीने पीसीबी आणि निवडकर्त्यांच्या निर्णयावर टीका केली. इंझमामच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने आशिया चषक संघात शान मसूद आणि इसानुल्ला यांचा समावेश केला नाही. त्याचवेळी फहीम अश्रफचे 2 वर्षांनंतर संघात पुनरागमन होताना दिसत आहे.
पीसीबी आता दहानीवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे
25 वर्षीय दहानी पाकिस्तानी संघाकडून आतापर्यंत 2 वनडे आणि 11 टी-20 सामने खेळला आहे. दहानीच्या या ट्विटनंतर आता पाकिस्तानी बोर्ड त्याच्यावर कारवाई करण्याचा विचार करत आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर दहानीने त्याचे ट्वीट डिलीट केले आहे. (pakistani bowler angry tweet on pakistan cricket board)
महत्वाच्या बातम्या-
“टीम इंडिया नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल’, एशियन गेम्सआधी गायकवाडची हुंकार
फॉर्ममध्ये परतताच पृथ्वी शॉचा संघ निवडकर्त्यांवर निशाणा; म्हणाला, ‘मी विचारही करत नाही…’