जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा शेन वॉर्नचे नाव आवर्जुन घेतले जाते. वॉर्नने आपल्या गोलंदाजीने केलेले चमत्कार क्रिकेटजगत कधीही विसरणार नाही. विशेषत: शेन वॉर्नची खेळपट्टीवर चेंडू स्पिन करण्याची कला आजही एक गूढ आहे. शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत असे अनेक चेंडू टाकले, जे फलंदाजांसाठी आश्चर्यकारक ठरले होते. याच कारणामुळे तो कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
वॉर्नची गोलंदाजी हे इतर फिरकी गोलंदाजांसाठी एक उदाहरण आहे. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा गोलंदाज क्रिकेटच्या खेळपट्टीवर काहीतरी वेगळे करतो, तेव्हा त्याची तुलना वॉर्नच्या खेळपट्टीवर चेंडू फिरवण्याच्या कलेशी केली जाते. अशीच एक घटना पाकिस्तानी क्रिकेटमध्ये घडली आहे.
पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यामध्ये पाकिस्तानची फिरकी गोलंदाज गुलाम फातिमा हिने महिला एकदिवसीय चषकादरम्यान एक अद्भुत चेंडू फेकला, ज्यामुळे सर्वांना वॉर्नची आठवण झाली. पीसीबी डायनामाईट्सकडून खेळणाऱ्या फातिमाने, पीसीबी स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाज फरिहाला आपल्या षटकादरम्यान एक चेंडू फेकला, ज्यामुळे सर्व क्रिकेट चाहते चकित झाले आहेत.
That ball To Fareeha: Ghulam Fatima 2-35 at National Stadium, Karachi
##BackOurGirls #HarHaalMainCricket pic.twitter.com/sya89uqKe6— Ghulam Fatima (@ghulamfatima_19) September 12, 2021
फातिमाने प्रथम ‘फ्लाइट चेंडू’ फेकून फलंदाजाला लालूच दिली. मग चेंडू खेळपट्टीवर आदळताच चेंडूने जबरदस्त स्पिन केला व फलंदाजाचा मधला स्टंप उडवला. फातिमाने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पडला, पण जसा चेंडू खेळपट्टीवर आदळला चेंडू इतका फिरला की फलंदाज त्रिफळाचीत झाली. फलंदाजी करणारी फरीहा पण आश्चर्य चकित होऊन तिचा चेंडू पाहत राहिली.
हा चेंडू पाहून चाहत्यांना वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ची आठवण आली असावी. चाहत्यांनी हा व्हिडीओ खुप शेअर केला आहे. तसेच फातीमाचे अभिनंदनही केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कुंबळे अन् जाफरमध्ये जोरदार जुगलबंदी; ‘कभी अलविदा ना कहना’, गात रंगवली मैफिल- VIDEO
पहिल्याच सामन्यात सीएसकेला धोबीपछाड देण्यासाठी रोहित ‘अशी’ घेतोय मेहनत, फोटो व्हायरल
विश्वचषकात निवड झालेला ‘हा’ खेळाडू स्विकारू शकतो निवृत्ती, सहकाऱ्याने केला दावा