पॅट कमिन्स मंगळवारी (१२ ऑक्टोबर) संध्याकाळी दुबईला ऑस्ट्रेलियाच्या टी२० विश्वचषक संघात सामील होण्यासाठी रवाना झाला. त्यापूर्वी त्याच्या घरी गोड बातमी आली आहे. त्याची प्रियसी बेकी बोस्टनने गेल्या शुक्रवारी (८ ऑक्टोबर) संध्याकाळी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव एल्बी बोस्टन कमिन्स ठेवले आहे.
कमिन्सला आपल्या मुलासह आणि कुटुंबासोबत आणखी काही वेळ घालवायचा होता, म्हणून त्याने काही दिवस घरी थांबण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याने आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातूनही माघार घेतली होती. कमिन्सने त्यांच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करण्यासाठी या बेकी बोस्टनच्या गर्भअवस्थेच्या प्रवासाचा एक भावनिक व्हिडिओ ब्लॉग पोस्ट केला आहे. पॅट कमिन्सने शेअर केलेला हा व्हिडिओ, त्या क्षणापासून सुरू होतो जेव्हा कमिन्सला कळते की तो वडील होणार आहे.
https://twitter.com/patcummins30/status/1447868775919882240
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघाचे आयपीएल खेळत नसलेले सदस्य गेल्या शुक्रवारी दुबईत दाखल झाले होते. आता पॅट कमिन्स आणि आयपीएलमध्ये खेळणारे इतर सदस्य दुबईमध्ये संघात सामील होतील आणि आपल्या आवश्यक ६ दिवसांचे विलगिकरण पूर्ण करतील. जेणेकरून १८ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडबरोबर सलामीच्या सराव सामन्यापूर्वी सर्व खेळाडू एकत्र येऊ शकतील.
ऑस्ट्रेलिया २३ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्याने टी२० विश्वचषक जेतेपदाच्या मोहिमेला सुरुवात करेल. ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार पॅट कमिन्सने वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर जाण्याचे टाळले होते. यासह, आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातही तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग राहिला नव्हता. जेव्हा कोविड -१९ ची दुसरी लाट भारताला लागली आणि आयपीएल अचानक स्थगित करावे लागले, तेव्हा पॅट कमिन्स मे महिन्यात घरी परतला होता. तेव्हापासून तो त्याच्या प्रेयसी बेकीसोबत वेळ घालवत होता.
कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या १८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये खेळलेला नाही. यामध्ये भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यांचा देखील समावेश आहे. आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा मे मध्ये पुढे ढकलण्यात आल्यापासून कमिन्सने एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. विश्वचषक सुरू झाल्यानंतर त्याला पुन्हा वेगाने परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. या २८ वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा टी -२० सामना सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
थँक्यू विराट! तो कर्णधार नसला, तरी कायम लीडर राहील, हर्षल पटेलने गायले गुणगान
टी२० क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक षटकार मारणारे ७ क्रिकेटर, यादीत रोहित शर्मा एकमेव भारतीय