सिडनी सिक्सर्सने बिग बॅश लीग २०२१ च्या क्वालिफायरमध्ये पर्थ स्कॉर्चर्सला ९ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी करताना १६७ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सने १७ व्या षटकात एक गडी गमावून आरामात विजय मिळविला. या सामन्यादरम्यान पर्थ स्कॉर्चर्सचे प्रतिनिधित्त्व करत असलेला मिचेल मार्श पंचांच्या चुकीचा निर्णयाचा शिकार बनला. त्यामुळे राग अनावर झाल्याने मार्शने चालू सामन्यात पंचांना शिवीगाळ केली. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला दंड ठोठावला आहे.
मिचेल मार्शने उच्चारले अपशब्द
झाले असे की, ८३ धावांवर संघाने आघाडीचे ३ फलंदाज गमावल्यानंतर अष्टपैलू मिचेल मार्श फलंदाजीसाठी आला होता. अशात डावातील १३वे षटक टाकत असलेल्या गोलंदाज स्टिव्ह ओफीकने अतिशय वाईट चेंडू फेकला. तो चेंडू खेळपट्टीच्या बाहेरील बाजूला फेकला गेला आणि स्पष्टपणे तो वाइड बॉल असल्याचे दिसत होते. तरीही सिडनी सिक्सर्सचा गोलंदाज ओफीक आणि यष्टीरक्षकाने जोरदार अपील केल्याने पंचांनी मार्श बाद झाल्याचा तडखाफडकी निर्णय दिला.
यामुळे अवघ्या २ धावांवर मार्शला पव्हेलियनला परतावे लागले. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे हताश झालेल्या मार्शने मैदानाबाहेर जाताना पंचांना अपशब्द म्हटले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्शला ५००० डॉलर्स (जवळपास ३ लाख ५० रुपये) रुपयांचा दंड ठोठावला आहे. असे असले तरी, त्याने मागील दोन वर्षात आचार संहितेचे उल्लंघन न केल्याने त्याला निलंबित करण्यात आले नाही. त्यामुळे तो बिग बॅश लीगच्या पुढील बादफेरी सामन्यात खेळताना दिसेल.
मिचेल मार्शचे वक्तव्य
मिचेल मार्शने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या शिक्षेचा स्विकार करत म्हटले की, “माझ्यावर लावण्यात आलेला दंड भरण्यास मी तयार मी तयार आहे. मी पंचांसोबत केलेला व्यवहार अस्विकाहार्य होता. येणाऱ्या पिढीपुढे मला माझे असे उदाहरण द्यायचे नाही. मी पंचांच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. मला या प्रकरणातून धडा मिळाला आहे. आता मला माझे पूर्ण लक्ष बादफेरीतील सामन्यावर केंद्रित करायचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला पराभूत करायचं असेल तर ‘ही’ गोष्ट करावीच लागेल, इंग्लंडच्या स्टार खेळाडूची प्रतिक्रिया
कोण जिंकणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? अंतिम चुरशीसाठी आज तमिळनाडू आणि बडोदा आमने-सामने
आयपीएल प्रेमींसाठी खुशखबर; भारतातच होणार आयपीएल २०२१ चे आयोजन ?