कोणताही खेळ असो, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला भेटणं खेळाडूसाठी सर्वात मोठा सन्मान असतो. भारतासारख्या देशात तर क्रिकेट म्हणजे एखादा धर्म, आणि त्या खेळातून नावारूपाला आलेले खेळाडू चाहत्यांसाठी देव. असेच काही खेळाडू त्या देवत्वपर्यंत पोहोचले, तर त्याचदिवशी डेब्यू करून काही विस्मरणात गेले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच पाच जोड्यांविषयी माहिती करून घेऊ, ज्यांनी एकाच दिवशी इंडियाची जर्सी घातली पण, त्यातला एक अर्शवर पोहोचला आणि दुसरा फर्शवर राहिला.
सचिन तेंडुलकर आणि सलील अंकोला
आपण इंट्रोमध्येच क्रिकेटचा देव असा उल्लेख केला. त्यामुळे व्हिडिओची सुरुवात त्याच क्रिकेटच्या देवापासून म्हणजेच सचिन तेंडुलकरपासून करायला हवी. ज्या मॅचमध्ये सचिनने अगदी सोळाव्या वर्षीच डेब्यू केला त्या मॅचमध्ये, भारतासाठी आणखी एक जण आपली पहिली मॅच खेळत होता. तो होता त्याचाच मुंबईकर साथीदार सलील अंकोला. आता सचिनने आपल्या करियरमध्ये काय कमावले? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर पीएचडी बनेल. क्रिकेटविश्वातील सारेच मोठे विक्रम फक्त सचिनच्या नावावर आहेत. दुसरीकडे ऑलराऊंडर असलेल्या सलील अंकोलाच्या करियरने म्हणावी तशी उसळी मारलीच नाही. खराब फॉर्म आणि इंजुरी याच्यामध्ये त्याचं करिअर असं अडकल की, मोजून २१ इंटरनॅशनल मॅच खेळून त्यान, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. पुढे फिल्म लाईनमध्ये येत त्याने तिकडेच कायमची दुसरी इनिंग खेळली.
एमएस धोनी आणि जोगिंदर शर्मा
सचिनपाठोपाठ कोणत्या भारतीय क्रिकेटरची सर्वाधिक फॅन फॉलोइंग असेल तर तो आहे एमएस धोनी. भारतच काय वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सक्सेसफुल कॅप्टन बनला धोनी. धोनीनं २००४च्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध वनडेतून इंटरनॅशनल डेब्यू केला. पुढे सोळा वर्ष क्रिकेटजगतावर फक्त त्याचीच सत्ता राहिली. इंडियाला दोन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वन नेण्यात धोनीच्या कॅप्टन्सी कौशल्याचा सिंहाचा वाटा राहिला. धोनी महानतेच्या पुढे गेला, पण त्याचमधून डेब्यू करणाऱ्या जोगिंदर शर्माच करियर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मॅचच राहिलं. तरीही फास्ट बॉलर असलेला जोगिंदर शर्मा भारतीयांच्या कायम आठवणीत राहणार. कारण, २००७ टी२० वर्ल्डकपची लास्ट ओवर टाकत टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देण्याचा, सुवर्णक्षण त्याच्याच वाट्याला आला.
रविचंद्रन अश्विन आणि पंकज सिंग
भारताकडून एकाच दिवशी डेब्यू करून एक हिट आणि दुसरा फ्लॉप अशा खेळाडूंची यादी काढायची झाली तर, रविचंद्रन अश्विन आणि पंकज सिंग ही नावे त्यात नक्की सामील करावी लागतील. स्पिनर अश्विन आणि फास्टर पंकज यांनी २०१० ला एकत्रच इंडियाची जर्सी घातली, पण आज अश्विन अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताचा सर्वात सक्सेसफुल स्पिनर ठरला. इंडियाच्या व्हाईस कॅप्टनपर्यंत पोहोचला. त्याचवेळी पंकज सिंग डेब्यू वनडे आणि त्यानंतर दोन टेस्ट खेळून टीम इंडियातून कायमचा बाहेर झाला. आयपीएल आणि डोमेस्टिकमध्ये मात्र त्याने भरपूर नाव कमावलं. आजही अनेकांना पंकज सिंग भारतासाठी खेळला आहे हे माहितही नसेल.
सुरेश रैना आणि वेणुगोपाल राव
एकवेळ टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपची जान असणारा सुरेश रैना यांनीदेखील असेच एका साथीदारासह आपला डेब्यू केलेला. तो होता वेणुगोपाल राव. रैना आणि दोघेही मिडल ऑर्डर बॅटर. कदाचित हीच स्पर्धा वेणुगोपाल रावसाठी मारक ठरली. रैनाची बॅटिंग स्टाईल मॉर्डन क्रिकेटला सूट झाली आणि त्याच करिअर १२-१३ वर्ष चाललं. इतकाच काय तो इंडियाचा कॅप्टनही बनला. डोमेस्टिक जॉयंट असलेल्या रावच्या करिअरला १५ इंटरनॅशनल वनडेनंतर ब्रेक लागला तो कायमचाच.
गौतम गंभीर आणि अविष्कार साळवी
या यादीचा शेवट होतो गौतम गंभीर आणि अविष्कार साळवी या नावांनी. गंभीर ओपनर बॅटर तर अविष्कार फास्ट बॉलर. दोघांनी २००३ला डेब्यू केला, पण चार वनडेनंतर अविष्कार इंटरनॅशनल क्रिकेटमधून गायब झाला. जहीर, इरफान, नेहरा यांच्या स्पर्धेत तो टिकलाच नाही. त्याचवेळी गंभीरने मिळालेल्या संधी पटापट पकडत वीरेंद्र सेहवागसोबत जोडी बनवत टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिले. दोन वर्ल्डकप फायनलमध्ये त्याच्या मॅचविनिंग इनिंग राहिल्या. काही मॅचमध्ये त्याला इंडियाचं नेतृत्व करायची संधीही मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?
कहाणी ‘दादा’लाच केकेआरमधून बाहेर काढण्याची, काय होतं गांगुलीला संघातून काढण्यामागील कारण