नुकताच आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव ( IPL 2022 Mega auction) पार पडला. माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आयपीएल लिलावावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा आयपीएल जवळ येत असते तेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जास्त चांगली कामगिरी करत नाहीत. कारण दुखापत होवू नये. तसेच त्यांनी लिलावात न विकलेल्या खेळाडूंवर सुद्धा प्रतिक्रीया दिल्या आहेत. हे खेळाडू अजूनही बदली म्हणून परत येऊ शकतात, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.
आयपीएल २०२२ च्या आयपीएल लिलावात जगातील दिग्गज खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागली होती. अनेक खेळाडू महागड्या किमतीत विकले गेले. तसेच सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ महान खेळाडूंवर कोणत्याच फ्रॅंचायझींनी बोली लावली नाही. आयपीएल लिलावाला अनेक क्रिकेट चाहत्यांनी फॉलो केले होते.
सुनील गावसकर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या लेखात म्हटले आहे की “आयपीएल लिलाव जीवन बदलणारा आहे. कारण तो त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करतो. यामुळे बरेच खेळाडू विशेषत: जेव्हा आयपीएल जवळ येते तेव्हा त्यांच्या देशासाठी खेळताना जास्त प्रयत्न करत नाहीत.”
गावसकर पुढे म्हणाले की, “लिलावादरम्यान ज्या खेळाडूंची निवड झाली नाही त्यांना अजूनही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे की, संघांनी त्यांची निवड न करून चूक केली आहे. आता आयपीएलमध्ये जास्त संघ आहेत आणि त्यामुळे अनेक खेळाडू पुनरागमन करू शकतात. आयपीएलमध्ये खेळाडू कोट्याधीश होतात. जगातील प्रत्येक दिग्गज क्रिकेटरला आयपीएलमध्ये खेळायचे असते. आपल्या देशासाठी खेळण्याबरोबरच आयपीएलचा भाग व्हावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते.”
यावर्षी पार पडलेल्या दोन दिवसाच्या लिलावात ५९० खेळाडूंपैकी एकूण २०४ खेळाडू विकले गेले. या खेळाडूंवर १० फ्रॅंचायझींनी बोली लावली. आयपीएल लिलावात सर्वात जास्त बोली इशान किशनवर लागली. त्याच्यावर मुंबई इंडीयन्स संघाने १५.२५ कोटी रुपयांची बोली लावत विकत घेतले आहे. ११ खेळाडूंवर १० कोटींहून अधिक बोली लागलाी.
महत्वाच्या बातम्या-
रहाणे ‘अजिंक्य’! नाबाद शतकासह दिली निवडसमितीला सणसणीत चपराक (mahasports.in)
बंगालच्या क्रीडामंत्र्यांनी रणजीच्या रणांगणात रचला इतिहास! (mahasports.in)