आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा वनडे विश्वचषक क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते. यावर्षी वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विश्वचषक आपल्या देशात खेळला जाणार, म्हणून पूर्ण तयारीत आहे. अशातच शुक्रवारी (22 सप्टेंबर) आयसीसीकडून विश्वचषकाती बक्षीसांची घोषणा केली गेली.
यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषकावर एकूण 10 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करणार आहे. विजेत्या संघासाठी आयसीसीकडून 33.18 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच उपविजेत्या संघाला 16.59 कोटी रुपये मिळतील. उपांत्यपूर्ण फेरीत पोहोचून पराभूत होणाऱ्या संघांसाटी आयसीसीकडून 6.63 कोटी रुपये दिले जातील. ग्रुप स्टेजच्या शेवटी क्वॉलिफाय होऊ न शकलेल्या संघांना 82.94 लाख रुपये दिले जातील. त्याचसोबत ग्रुप स्टेजमध्ये जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी जिंकणाऱ्या संघाला बश्रीस मिळणार आहे. प्रत्येक ग्रुप स्टेज सामन्यासाठी आयसीसीकडून 33.77 लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे. (Prize money for ICC Men’s Cricket World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील रंगतदार सामन्यात पावसाची हजेरी, पाहुण्यांचे चार फलंदाज तंबूत
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर