संपुर्ण नाव- युवराज सिंग
जन्मतारिख- 12 डिसेंबर, 1981
जन्मस्थळ- चंदिगड
मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, दिल्ली देअरदेविल्स, भारत अ, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनराइजर्स हैद्राबाद, टोरोन्टो नॅशनल्स आणि यॉर्कशायर
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 16 ते 20 ओक्टोबर, 2003
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध केन्या, तारिख – 3 ऑक्टोबर, 2000
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध स्कॉटलँड, तारिख – 13 सप्टेंबर, 2007
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 40, धावा- 1900, शतके- 3
गोलंदाजी- सामने- 40, विकेट्स- 9, सर्वोत्तम कामगिरी- 2/9
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 304, धावा- 8701, शतके- 14
गोलंदाजी- सामने- 304, विकेट्स- 111, सर्वोत्तम कामगिरी- 5/31
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 58, धावा- 1177, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 58, विकेट्स- 28, सर्वोत्तम कामगिरी- 3/17
थोडक्यात माहिती-
-भारताचा फायटर क्रिकेटपटू युवराज सिंग हा लहानपणी क्रिकेटचा नव्हे, तर टेनिस आणि रोलर स्केटिंगचा चाहता होता. त्याने राष्ट्रीय स्तरावरील 14 वर्षांखालील स्केटिंग चॅम्पियनशिपनही जिंकले आहे. मात्र, वडील भारताचे माजी क्रिकेटपटू असल्याने त्यांना क्रिकेटला जास्त महत्त्व द्यावे लागले.
-युवीचे वडील योगराज सिंग हे भारताचे माजी वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना भारताकडून 1 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले आहेत. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ते सिनेसृष्टीकडे वळले. ते पंजाब सिनेसृष्टीचे अभिनेता आहेत.
-युवी लहानपणी क्रिकेटमध्ये जास्त पारंगत नव्हता. ते लहानपणी नवजोत सिंग सिद्धू यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी युवी साध्या फुल टॉसवरतीही बाद होत असल्याने सिद्धूंनीही त्याच्याकडून अपेक्षा करणे सोडले होते.
-युवीला त्याच्या वडिलांनी फलंदाजीच प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी त्याला वेगवान गोलंदाजीचा सामना करायला शिकवला. पुढे युवीला मुंबईतील इएलएफ-वेंगसकर क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले.
-युवीने वयाच्या 13व्या वर्षी म्हणजेच 1995साली 16 वर्षांखालील पंजाब संघाकडून खेळण्यास सुरुवात केली.
-पुढे त्याने 19 वर्षांखालील पंजाब संघाकडून खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध 137 धावांची मोठी खेळी केली होती. तर, त्याने बिहारविरुद्धच्या 19 वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीत 358 धावांची मोठी खेळी केली होती.
-1996-97च्या ओडिसाविरुद्दच्या रणजी ट्रॉफी सामन्यातून युवीने प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्यानंतर 1999-2000 साली त्याने हरियानाविरुद्ध 149 धावा करत आपले कौशल्य दाखवून दिले.
-युवीचे भारतीय वनडे संघात पदार्पण चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेतून झाले. 2000 साली केन्याविरुद्धच्या सामन्यातून त्याने पदार्पण केले खरे पण त्याला यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याने 80 चेंडूत 84 धावा केल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज गोलंदाजाविरुद्ध खेळताना त्याने ही आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
-2002सालच्या नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यामुळे युवीच्या क्रिकेट कारकिर्दीला वळण मिळाले. या सामन्यात इंग्लंडविरुद्ध युवीने 63 चेंडूत केलेल्या 69 धावांमुळे भारताने 2 विकेट्सने तो सामना जिंकला होता.
-2003चच्या विश्वचषकातील युवीच्या 2 अर्धशतकांमुळे भारत ढाका येथील बांग्लादेश दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी युवीने 85 चेंडूत नाबाद 102 धावांची शतकी खेळी केली होती.
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनंतर युवी हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू होता, ज्याने यॉर्कशायर या काउंटी संघाकडून क्रिकेट खेळले आहे. हा असा सन्मान आहे जो खूप कमी खेळाडूंना मिळतो.
-2003 साली न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण करणारा युवी त्याच्या कसोटीत चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याने 40 कसोटीत 1900 धावा केल्या. त्याला कसोटीतील त्याचे स्थान जास्त काळ टिकवता आले नाही.
-2007 सालच्या आयसीसी टी20 विश्वचषकात युवीने अनेक विक्रम केले. मर्यादित षटकांच्या या क्रिकेटमध्ये इग्लंडविरुद्ध युवीने अवघ्या 12 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम आजही त्याच्या नावावर कायम आहे.
-तर याच सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मैदानाच्या सर्व दिशांमध्ये एका षटकात 6 षटकार मारले होते. असा कारनामा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांच कोणत्या फलंदाजाने केला होता.
-तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरित त्याने 30 चेंडूत 70 धावा करण्याचा पराक्रम केल्याने त्याला सलामीवीर पुरस्कार देण्यात आला होता.
-शिवाय या विश्वचषकात युवीने सर्वात मोठा षटकारही ठेकला होता. जो 119 मीटर दूरपर्यंतचा होता.
-युवीला त्याच्या क्रिकेट आदर्श सचिन तेंडूलकरसोबत क्रिकेट खेळण्याचीही संधी मिळाली होती. त्यांनी 2008ला चेन्नईत इंग्लंडविरुद्ध 163 धावांची भागीदारी केली होती. त्यांच्या खेळीमुळे भारताने कसोटी जिंकली होती.
-भारतात झालेल्या या 2011 विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेला युवराजने या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती.
भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा वनडे विश्वचषक जिंकण्यात युवराजचा वाटा मोठा होता. याच विश्वचषकात त्याच्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराची सुरुवात झाली होती. त्याने या विश्वचषकात 4वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.
या विश्वचषकात युवराजने 90.50 च्या सरासरीने एक शतक आणि चार अर्धशतकांसह 9 सामन्यात 362 धावा केल्या होत्या आणि 15 बळी घेतले होते. यासह एका विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू बनला होता. तर त्याने मालिकावीर पुरस्कारही मिळवला होता.
-शिवाय ट्वेंटी20 सामन्यात 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटूही ठरला.
-युवीने खेळलेल्या आयपीएलच्या 7 हंगामात त्याने 4 संघाकडून क्रिकेट खेळले. त्याने सुरुवातीचे 3 हंगाम किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळले. पुढे पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स संघाचा भाग होता. आयरीएलमधील त्याच्या सर्वाधिक 83 धावा त्याने आरसीबीकडून खेळताना केल्या होत्या.
-2014 साली आयसीबीने युविला 14 कोटींना विकत घेतले होते. तर 2015 साली दिल्ली डेअरडेविल्सने त्याच्या 16 कोटींच्या किमतीने त्याला सर्वात महागडा आयपीएल खेळाडू बनवले.
-2012 साली भारताचे राष्ट्रपती प्रनव मुखर्जी यांच्याहस्ते त्याला अर्जुन पुरस्कर मिळाला. तर, 2014 साली पद्मश्रीने त्याला सन्मानित करण्यात आले.
-युवीने मेंहदी सजदा दी आणि पट्ट सरदारा या पंजाबी सिनेमात बाल अभिनेत्याचे काम केले आहे. तर, जम्बो या बॉलिवूड फिल्ममध्ये त्याने व्हॉईस दिला आहे.
-युवावयात युवीचे दिपिका पादुकोनसोबत काही काळ संबंध होते. पुढे त्याने कीम शर्माला काही काळ डेट केले. तर, शेवटी 2016 साली त्याचे हेजल कीचसोबत लग्न झाले.
-युवीने त्याच्या कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर युविकॅन एनजीओचा सुरुवात केली.
-तर, युवीच्या आयुष्यावर द टेस्ट ऑफ माय लाईफ: फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर ऍन्ड बॅक हे आत्मचरित्र लिहिले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!