पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (PCB) अंतर्गत आयोजित केली जाणारी टी२० स्पर्धा पाकिस्तान सुपर लीग (PSL) या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. यावर्षी पीएलएलचा सातवा हंगाम खेळला जाणार आहे, जो २७ जानेवारीपासून सुरू होईल. परंतु, हंगाम सुरू होण्यापूर्वी पीसीबीला एक मोठा झटका बसला आहे. पीएलएलच्या पुढच्या हंगामात दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू सहभागी होऊ शकणार नाही. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डने त्यांना या लीगसाठी परवानगी नाकारली आहे.
दक्षिण अफ्रिका संघाचे आगामी काळातील वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे राष्ट्रीय संघाशी जोडल्या गेलेल्या खेळाडूंना देशासाठी उपस्थित राहावे लागेल. यादरम्यान ते विदेशी लीगमध्ये सहभाग घेऊ शकणार नाहीत. एका क्रिकेट संकेतस्थळाने दक्षिण अफ्रिका क्रिकेटचे निर्देशक आणि माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या हवाल्याने सांगितले की, “हे खरे आहे की, प्रोटियाज संघाच्या (दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघ) करारबद्ध खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगसाठी नाहरकत प्रमाण पत्र दिले गेले नाही. कारण, यादरम्यान आंतराष्ट्रीय कॅलेंडर आणि देशांतर्गत स्पर्धा खेळल्या जाणार आहेत आणि त्यांना नेहमीच प्राथमिकता दिली जाईल.”
दक्षिण अफ्रिका संघ सध्या मायदेशात भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. त्यानंतर, लगेचच संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होईल. याविषयी बोलताना स्मिथ म्हणाला की, “न्यूझीलंड दौरा आणि नंतर बांगलादेशविरुद्ध मायदेशातील मालिका पाहता आमच्या करारबद्ध खेळाडूंना सर्वात आधी राष्ट्रीय सेवेसाठी उपलब्ध राहायचे आहे. हिच गोष्ट आमच्या देशांतर्गत फ्रेंचायझी स्पर्धेला देखील लागू असेल, जी लवकरात लवकर सुरू होणार आहे.”
स्मिथने पुढे बोलताना स्पष्ट केले की, येत्या काळात जर एखादी विदेशी लीग खेळली गेली आणि त्यावेळी दक्षिण अफ्रिकी संघाच्या देशांतर्गत स्पर्धेचे आयोजन केले गेल नसेल, तर बोर्ड खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची परवानगी देईल. दरम्यान, पीएलएलमध्ये खेळणाऱ्या दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंचा विचार केला, तर यामध्ये प्रमुख्याने वेगवान गोलंदाज मर्चंट डी डिलांग, राइली रूसो आणि इम्रान ताहिर यांचा सहभाग आहे, जे या स्पर्धेत वेगवेगळ्या संघांसाठी खेळतात.
महत्वाच्या बातम्या –
पटना पायरेट्सची रोमहर्षक सामन्यात गुजरातवर मात; एका गुणाने साजरा केला विजय
‘हे’ दोन खेळाडू अजूनही राहाणार टीम इंडियात कायम, मुख्य प्रशिक्षक द्रविडचे संकेत
PHOTOS: जेसन रॉय दुसऱ्यांदा बनला ‘बाबा’; शेअर केले ‘हॅप्पी’ फॅमिलीचे फोटो
व्हिडिओ पाहा –