पाकिस्तान सुपर लीग २०२२ (PSL 2022) स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात अशी काही घटना घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतो. दरम्यान या स्पर्धेत रविवारी (३० जानेवारी ) झालेल्या सामन्यात एका फलंदाजाने हुबेहूब एमएस धोनी (Ms dhoni helicopter shot) सारखा हेलिकॉप्टर शॉट खेळल्याचे पाहायला मिळाले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रविवारी (३० जानेवारी ) पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) आणि पेशावर जाल्मी (Peshwar jalmi) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड संघातील फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजने (Rahmnullah gurbaz) हेलिकॉप्टर शॉट खेळल्याचे पाहायला मिळाले.
तर झाले असे की, इस्लामाबाद युनायटेड संघाची फलंदाजी सुरू असताना, पेशावर जाल्मी संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी सोहेल खान गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने फुल लेंथ चेंडू टाकला ज्यावर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजने मिड विकेटच्या वरून ६ धावांसाठी हेलिकॉप्टर शॉट मारला. या शॉटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी फलंदाज एमएस धोनी हा शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक फलंदाज आहेत, जे एमएस धोनीच्या या शॉटची हुबेहूब कॉपी करतात. यामध्ये हार्दिक पंड्याचा समावेश आहे. तसेच आता या यादीत रहमानुल्लाह गुरबाजचा देखील समावेश झाला आहे. रहमानुल्लाह गुरबाज हा अफगाणिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करतो.
whats up with afghanistan and the helicopter pic.twitter.com/kdyLmXAd1P
— Jazib (@JazibChaudry) January 30, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पेशावर जाल्मी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रुदरफोर्डने ७० धावांची तुफान खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेड युनायटेड संघाने १ गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. इस्लामाबाद युनायटेड संघाकडून ऍलेक्स हेल्सने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या :
U19 World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मिळाली ‘ही’ गुड न्यूज
आयपीएलच्या इतिहासातील ५ खोट्या गोष्टी चाहत्यांना वाटतात खऱ्या, जाणून घ्या त्यामागचे सत्य
रोहित अँड कंपनी अहमदाबादमध्ये दाखल, ‘इतके’ दिवस खेळाडू राहाणार क्वारंटाईन