भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला.
विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी रोहित शर्माने योग्यरीत्या पार पाडली. तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची देखील ही पहिलीच मालिका आहे. हा सामना झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी असे काही कृत्य केले होते. ज्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, ज्यावेळी भारतीय संघाने विजय मिळवला त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल भलतेच खुश झाले होते. त्यावेळी राहुल द्रविड उठले आणि आपल्या मागे बसलेल्या व्यंकटेश अय्यरचे अभिनंदन केले आणि हात मिळवला. हा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्यंकटेश अय्यरचा हा पहिलाच सामना होता. आयपीएल स्पर्धेत आणि यावर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर व्यंकटेश अय्यरची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. हा सामना झाल्यानंतर रोहित शर्मा देखील भलताच खुश झाला होता. सामन्यानंतर रोहित शर्माने विरोधी संघातील गोलंदाज ट्रेंट बोल्टची भेट घेतली आणि त्याच्यासोबत मस्ती देखील केली.
https://www.instagram.com/p/CWYpfShAk07/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ७०, तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ६ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ४८ धावांचे योगदान देत भारतीय संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोमहर्षक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने ‘या’ २ खेळाडूंचे गायले गुणगान