कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पार पडली असून बुधवारपासून टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या टी२० मालिकेत ३ सामने खेळवले जाणार आहेत. ही संपूर्ण मालिका ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१६ फेब्रुवारी) पार पडला असून या सामन्यातून युवा फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने पदार्पण केले.
भारताचा २१ वर्षीय गोलंदाज रवी बिश्नोई भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण (T20I Debut) करणारा ९५ वा खेळाडू ठरला आहे. तसेच हे बिश्नोईचे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ३८५ वा खेळाडू ठरला आहे. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप भारताचा दिग्गज फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हस्ते देण्यात आली. कॅप प्रदान करण्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की चहलने रवीला कॅप दिल्यानंतर सर्व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. तसेच रवीही आंतरराष्ट्रीय पदार्पण करून खूश आहे.
Congratulations to Ravi Bishnoi who is all set to make his debut for Team India.@Paytm #INDvWI pic.twitter.com/LpuE9QuUkk
— BCCI (@BCCI) February 16, 2022
अशी आहे रवी बिश्नोईची कामगिरी
रवी बिश्नोई देशांतर्गत क्रिकेट राजस्थान संघाकडून खेळतो. मात्र, अद्याप त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. असे असले, तरी त्याला अ दर्जाच्या क्रिकेटचा आणि टी२० क्रिकेटचा अनुभव आहे. त्याने १७ अ दर्जाचे सामने खेळले असून २४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने टी२० क्रिकेटमध्ये ४२ सामने खेळले असून ४९ विकेट्स घेतल्या आहेत.
रवी बिश्नोईला खरी ओळख मिळाली ती आयपीएलमधून. त्याने आयपीएलमध्ये खेळताना अनेकदा चमकदार कामगिरी केली. त्याने २०२० आयपीएल हंगामातून पंजाब किंग्सकडून पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २३ सामने खेळले असून २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला आता आयपीएल २०२२ साठी लखनऊ सुपरजायंट्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. त्याच्यासाठी लखनऊ संघाने ४ कोटी रुपये मोजले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय दिग्गज म्हणतोय, “सनरायझर्समध्ये विलियम्सन बनणार बळीचा बकरा”
“भारत-पाकिस्तान सामन्यासाठी व्हा तयार” पाकिस्तानी कर्णधाराची ललकारी
INDvsWI: पहिल्या टी२०मध्ये रोहितने जिंकला टॉस, भारताकडून बिश्नोईचे पदार्पण; पाहा कसे आहेत दोन्ही संघ