इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली खेळी केली होती. ज्यामुळे भारतीय संघाला १-० ने आघाडी मिळाली होती. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले. मात्र, लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
या दरम्यान मैदानात तो गुडघ्याला धरून चालताना दिसत होता. यानंतर रवींद्र जडेजा सामन्याच्या मधेच ३२ व्या षटकादरम्यान मैदान सोडून बाहेर गेला होता. ज्यानंतर त्याने गोलंदाजी देखील केली नव्हती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला होता. ज्यात त्याने २५ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या होत्या. सामना संपल्यानंतर जडेजा लगेचच पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. ज्यामुळे भारतीय संघात जडेजाच्या खेळण्यावर चिंता निर्माण झाली होती.
मात्र, जडेजाने मंगळवारी (३१ ऑगस्ट) नेट्समध्ये येऊन सरावाला सुरुवात केली. ज्यामध्ये त्याने फलंदाजीचा सराव केला. याबाबतचा त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. यावरून जडेजा पुढील कसोटी सामन्यात उपलब्ध असणार आहे हे स्पष्ट होते.
दरम्यान, जडेजाने सुरुवातीचे तीनही कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक यांनी इंग्लंड सारख्या परिस्थितीत ४ वेगवान गोलंदाज खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जडेजाला अश्विन ऐवजी संघात संधी मिळाली होती.
असे असले तरी, जडेजाला पहिल्या २ कसोटी सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाने २ विकेट घेतल्या. ज्यामध्ये त्याने इंग्लंडकडून चांगली खेळी करत असलेल्या सलामीवीर फलंदाज हसिब हमीदला त्रिफळाचीत केले होते. तसेच दुसरी विकेट घेत त्याने मोइन अलीला बाद केले होते. ज्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने २५ चेंडूमध्ये ३० धावा केल्या होत्या. मात्र, तोपर्यंत हा सामना भारतीय संघाच्या हातातून सुटला होता.
तिसरा सामना गमावल्यानंतर कोहलीने संघात मोठ्या बदलांचे संकेत दिले होते. अशात कोणत्या खेळाडूला संघात संधी मिळणार आणि कोणत्या खेळाडूला खाली बसावे लागणार, हे पाहावे लागेल. दरम्यान इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरने देखील चौथ्या कसोटी सामन्यातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये देखील अंतिम ११ मध्ये बदल होऊ शकतात.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर गुरूवार (२ सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल २३४३ दिवस कसोटीमध्ये अव्वल राहिलेल्या स्टेनकडे एकेकाळी बूट घ्यायलाही नव्हते पैसे, वाचा त्याचा प्रवास
–Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली
–अरे बापरे! शिमरन हेटमायरने चक्क ड्वेन ब्रावोवर उगारली आपली बॅट, पाहा व्हिडिओ