आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात आरसीबीचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने जबरदस्त गोलंदाजी केली. केवळ 4 षटकांत 8 धावा देऊन 3 बळी घेतले. तसेच 2 षटके त्याने निर्धाव टाकली. कोलकाताचा फलंदाज नितीश राणाला जसा विचार केला होता, अगदी तशाच प्रकारे बाद केले असे सिराजने सांगितले.
सिराजच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर सिराज म्हणाला की, “मी नवीन चेंडूने नेटमध्ये गोलंदाजी करत होता. आज सामन्यात संधी मिळाली. संघात खेळाडूंचा मूड चांगला होता. प्रत्येकजण एकमेकांना पाठिंबा देत देतो, एकमेकांशी संवाद साधतो. नितेश राणाला अगदी मनाप्रमाणे बाद केल.”
मोहम्मद सिराज नवीन चेंडूने गोलंदाजी करत असताना केकेआरचे फलंदाज चांगलेच अस्वस्थ झाले होते. पहिल्या दोन षटकात सिराजने एकही धाव न देता तीन गडी बाद केले. यापूर्वी आयपीएलच्या सामन्यात कोणत्याही गोलंदाजांनी दोन षटके निर्धाव टाकली नव्हती. अशी कामगिरी करणारा सिराज हा एकमेव गोलंदाज ठरला आहे.
मोहम्मद सिराजच्या पाठोपाठ वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी आपले पहिले षटक निर्धाव फेकले आणि याचबरोबर आरसीबीने एका डावात चार षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम नोंदवला.
आरसीबीच्या भेदक गोलंदाजीमुळे केकेआर संघाला 20 षटकांत आठ बाद 84 धावाच करता आल्या. त्यानंतर आरसीबीने दोन गडी गमावून 85 धावांचे हे लक्ष्य सहज गाठले. कर्णधार बदलण्याचा फायदा केकेआरला झाला नाही. मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२०: कोलकाताविरुद्धच्या विजयानंतर बेंगलोरची दुसऱ्या क्रमांकावर भरारी; पाहा अशी आहे गुणतालिका
मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
‘शूजची लेस नाही तर ख्रिस गेलचे पाय…’ दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर अश्विनचे ट्विट
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला