कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात दुसरा टी२० सामना (Second T20I) झाला. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करत वेस्ट इंडिजला १८७ धावांचे आव्हान दिले होते. यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यांच्या अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा होता. यासह रिषभने माजी भारतीय यष्टीरक्षक आणि आपला गुरू म्हणवणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याचा एक विक्रम मोडला आहे.
रिषभ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक अर्धशतके करणारा यष्टीरक्षक बनला (Most T20I Fifty By Indian Wicketkeeper) आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये खूप जास्तही अर्धशतके केली नाहीत. वेस्ट इंडिजविरुद्धचे अर्धशतक हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील केवळ तिसरेच अर्धशतक होते. त्याने या सामन्यात २८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावा केल्या.
अशाप्रकारे तिसऱ्यांदा धावांची पन्नाशी गाठत त्याने धोनीला मागे टाकले आहे. धोनी त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत ९८ सामने खेळताना केवळ २ अर्धशतके करू शकला होता. तर पंतने आतापर्यंत केवळ ४३ टी२० सामने खेळताना ३ अर्धशतके केली आहेत.
FIFTY!@RishabhPant17 brings up his third T20I half-century off 27 deliveries 👏👏
Live – https://t.co/vJtANowUFr #INDvWI @Paytm pic.twitter.com/PjW5hKsv3k
— BCCI (@BCCI) February 18, 2022
नवलाची गोष्ट म्हणजे, रिषभने टी२० क्रिकेटमध्ये केलेली तिन्ही अर्धशतके वेस्ट इंडिजविरुद्धच आली आहेत. त्याने वर्ष २०१८ मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावरच ३८ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी केली होती. तर वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या बॅटमधून दुसरे अर्धशतक निघाले होते. त्याने तेव्हा ४२ चेंडूंचा सामना करताना ६५ धावा केल्या होत्या.
दरम्यान भारताला १८६ धावांची धावसंख्या उभारून देण्यात रिषभबरोबरच विराटचाही मोठा वाटा राहिला. कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन व सूर्यकुमार यादव स्वस्तात पव्हेलियनला परतल्यानंतर विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. तो ४१ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकार मारत ५२ धावांवर बाद झाला. त्यानंतर पंतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद अर्धशतक केले. तर वेंकटेश अय्यरने त्याला साथ देत १८ चेंडूत ३३ धावांची जलद खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून लाडक्या मुलाला क्रिकेट खेळताना पाहायला जात नाही सचिन, कारण आहे कौतुकास्पद
रेकॉर्ड अलर्ट! प्रथम श्रेणी पदार्पणात बिहारच्या क्रिकेटरचं त्रिशतक, केला एकच नंबर विश्वविक्रम
असं कोण धावबाद होतं! हरमनप्रीत कौर अतिशय सहज पद्धतीने रनआऊट, झाली प्रचंड ट्रोल